Mahamesh Yojana 2024 Apply Online: शेळी-मेंढी असेल तर मिळणार महिन्याला 6,000 रुपये लगेच अर्ज करा

Mahamesh Yojana 2024 Apply Online
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

महाराष्ट्र शासनाद्वारे Mahamesh Yojana 2024 Apply Online साठी अर्ज सुरू झाले आहेत. पात्र अशा व्यक्तींना सरकार मोठी मदत करणार आहे.

शेळी मेंढी असेल तर त्यांच्या चराई साठी महिन्याला 6,000 रुपये सोबत शेळी मेंढी पालन करण्यासाठी जागा म्हणून 1 गुंठा जमीन खरेदी साठी पैसे सोबत जोड धंदा म्हणून कुकुटपालन साठी 75% अनुदान दिले जाणार आहे.

ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, Mahamesh Yojana Apply Online करण्यासाठी पोर्टल सुरू झाले आहे.

फॉर्म भरण्यासाठी वेळ खूप कमी आहे, बोटावर मोजण्या इतकेच दिवस शिल्लक आहेत. 26 तारखेला अर्ज स्वीकारणे बंद होणार आहे, त्यामुळे शक्य तितक्या लवकर फॉर्म भरा आणि सरकार तर्फे Mahamesh Yojana साठी मिळणाऱ्या सुविधा प्राप्त करा.

Mahamesh Yojana 2024

mahamesh yojana
योजनाचे नावमहामेष योजना
सुरुवातमहाराष्ट्र शासन
उद्देशशेळी मेंढी पालन साठी अनुदान
लाभार्थीमागासवर्गीय धनगर समाजातील लोक
लाभशेळी मेंढी पालन साठी जागा खरेदी, महिन्याला 6000 रुपये + कुकुट पालन अनुदान
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Mahamesh Yojana साठी कोण पात्र आहे?

  • अर्जदार व्यक्ती हा भटक्या विमुक्त जाती जमाती मागासवर्गीय धनगर समाजातील असावा.
  • व्यक्तीच्या नावे कोणतीही शेतजमीन नसावी.
  • मेंढपाळ कुटुंबातील एका सदस्याला लाभ घेता येईल.
  • कुटुंबाकडे किमान 20 मेंढ्या आणि 1 मेंढानर असणे आवश्यक.
  • अर्जदार व्यक्तीचे वय हे 18 ते 60 वर्षे या दरम्यान असावे.
  • अर्जदाराचे बँक खाते आणि मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असावे.
  • व्यक्तीच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी सेवेत नसावा.
  • व्यक्तीने या पूर्वी Mahamesh Yojana चा लाभ घेतलेला नसावा.

Mahamesh Yojana चे लाभ आणि फायदे

शेळी मेंढी पालन करण्यासाठी 1 गुंठा जमीन, सोबत त्यांच्या चराई साठी प्रत्येक महिन्याला अनुदान, जोड धंदा म्हणून कुकुट पालन करण्यासाठी अनुदान.

कागदपत्रे कोणते लागणार? लिस्ट चेक करा

शेळी मेंढी पालन जमीन खरेदी

शेळी मेंढी पालन करण्यासाठी व्यक्तीला स्थायी स्वरूपात त्यांची देखभाल करता यावी म्हणून सरकार द्वारे Mahamesh Yojana 2024 अंतर्गत 1 गुंठा जमीन दिली जात आहे.

1 गुंठा जमीन घेण्यासाठी जेवढा खर्च येईल, तेवढी रोख रक्कम शासन व्यक्तीला देणार आहे.

शेळी मेंढी पालन चराई अनुदान

शेळी मेंढी पालन करण्यासाठी चारा महत्वाचा असतो, पावसाळ्यात मेंढपाळांना चराई साठी अडचणी येतात, त्यामुळे जून ते सप्टेंबर या 4 महिन्यासाठी सरकार द्वारे मेंढपाळांना चराई अनुदान दिले जाते.

अनुदान हे प्रत्येक महिन्याला मेंढपाळांच्या बँक खात्यात जमा केले जाते, 6000 रुपये महिना या प्रमाणे 4 महिन्याचे 24,000 रुपये मेंढपाळांना दिले जातात.

कूकुट पालन अनुदान

मेंढपाळांना शेळी मेंढी पालन सोबत कूकुट पालन करण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने, सरकार द्वारे राजे यशवंतराव चव्हाण महामेष योजना सुरू करण्यात आली.

या योजने अंतर्गत मेंढपाळांना कुकूट पालन करण्यासाठी आर्थिक मदत मिळते, ज्यांचे अर्ज Mahamesh Yojana 2024 Apply Online मार्फत Approved होतील त्यांना तब्बल 75% अनुदान दिले जाते, म्हणजे एकूण खर्चाच्या 75 टक्के रक्कम शासन देते.

महामेष योजना फॉर्म मंजूर झाला का?

तुम्हाला पैसे मिळतील का? स्टेटस चेक करा

Mahamesh Yojana Apply Online

Mahamesh Yojana साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, फॉर्म भरण्यासाठी तुम्ही खालील स्टेप फॉलो करू शकता.

ऑनलाईन अर्जApply Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख26 सप्टेंबर 2024

महामेष योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

Raje Yashwantrao holkar mahamesh yojana साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? Beneficiary Status कसे तपासायचे? अनुदानाचे पैसे कसे मिळणार? याची सविस्तर माहिती या सेक्शन मध्ये नमूद केली आहे.

  • Mahamesh.org या पोर्टलला भेट द्या.
  • संकेतस्थळावर आल्यावर नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करून तुमची नोंदणी पूर्ण करा.
  • नोंदणी झाल्यावर आयडी पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  • त्यानंतर Mahamesh Yojana Apply Online ‘अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करा.
  • अर्जामध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
  • वर सांगितलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • Mahamesh Yojana Form बरोबर असल्याची खात्री करा.
  • खात्री झाल्यास महामेष योजना फॉर्म सबमिट करून टाका.

तुमचा फॉर्म पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ कडे पाठवला जाईल, अधिकारी तुमचा फॉर्म तपासातील, अर्ज योग्य असेल आणि तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुमचा अर्ज Approved होईल.

एकदा अर्ज मंजूर झाला की मग तुम्हाला महामेष योजनेचे सर्व लाभ मिळतील, यात शेळी मेंढी पालन जमीन खरेदी, चराई अनुदान, कुकूट पालन अनुदान हे सर्व फायदे तुम्हाला घेता येतील.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top