Ladki Bahin Yojana New Update: महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत आणखी १२ लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
या योजनेअंतर्गत, २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० आर्थिक मदत दिली जाते. ऑक्टोबर महिन्यात दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे जमा करण्यात आले होते, त्यामुळे आता डिसेंबर महिन्याचा हप्ता स्वतंत्रपणे जमा केला जात आहे.
Ladki Bahin Paise Kadhi Yenar: अजून पैसे मिळाले नाही? लगेच हे 1 काम करा, तत्काळ 1500 खात्यात पडतील
नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरुवात झाली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी, महिलांनी आधार कार्ड आणि बँक खात्याचे DBT Seeding करणे आवश्यक आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविका आणि संबंधित कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे.
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. नवीन १२ लाख महिलांचा समावेश झाल्यामुळे, या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या आता २.५ कोटी च्या जवळ झाली आहे.
लाडक्या बहिणींना मिळणार महिन्याला 7000 रुपये, केंद्र सरकारची नवीन योजना Bima Sakhi Yojana 2024
काल २४ डिसेंबर ला पहिल्या टप्प्यात १२,८७,५०३ आधार सिडींग राहिलेल्या महिलांना पैसे पाठवले गेले आहेत, आज दुसऱ्या टप्प्यात ६७,९२,२९२ महिलांना पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या दोन ते चार दिवसाच्या आत सर्व उर्वरित लाभार्थी लाडक्या बहिणींना राज्य सरकार डिसेंबर चा १५०० रुपयांचा हप्ता पाठवणार आहे.
Mazya baykola ak pn hptta nh aala sir
माझ्या लाडक्या भावाला हार्दिक शुभेच्छा.
अशेच महिलांना साथ देत राहा .
तुमची लाडकी बहिण ☺️