Ladki Bahin Yojana Mobile Gift Form Link | लाडक्या बहिणींना मोफत फ्री मध्ये मोबाईल फोन वाटप ?

Ladki Bahin Yojana Mobile Gift Form Link
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 17 Average: 4.2]

सध्या इंटरनेटवर Ladki Bahin Yojana Mobile Gift Form Link संदर्भात मोठ्या प्रमाणात मेसेज वायरल होत आहे.

या मेसेज मध्ये सांगण्यात आला आहे की महाराष्ट्र शासनाद्वारे लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल फोन वाटप करण्यात येत आहे.

परंतु अशा प्रकारची कोणतीही शासकीय योजना महाराष्ट्र शासनाद्वारे अधिकृतपणे सुरू करण्यात आलेली नाही.

पण इंटरनेटवर Ladki Bahin Yojana Mobile Gift चा मेसेज का वायरल होत आहे? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर या प्रश्नाचे उत्तर आणि या आर्टिकल मध्ये तुम्हाला देणार आहोत.

महत्त्वाच्या अशी माहिती आहे, त्यामुळे काळजीपूर्वक माहिती वाचा. सोबतच इतर महिलांना देखील ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना पण याची सत्यता समजायला मदत होईल.

Ladki Bahin Yojana Mobile Gift

महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली, यामध्ये राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 दिले जात आहेत.

आतापर्यंत सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचे एकूण ₹7500 पर्यंत पैसे मिळाले आहेत.

पण आता सोशल मीडियावर लाडकी बहीण योजना अंतर्गत मोबाईल गिफ्ट मिळणार आहे असा व्हिडिओ तसेच मेसेज वायरल होत आहे.

राज्यातील दोन कोटीहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे या प्रकारच्या खोट्या बातम्यांचा प्रसार झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला Mobile Gift च्या प्रलोभनात येऊन स्कॅमच्या बळी पडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सतर्क रहा, तुमच्या ज्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात त्या बँकेची डिटेल्स कोणत्याही वेबसाईटवर अथवा ॲप वर देऊ नका.

लक्षात घ्या हॅकर लोक तुमचा हाच डेटा वापरून तुमचं बँक अकाउंट हॅक करू शकतात. त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील गमावू शकता.

स्पष्ट शब्दात सांगतो महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहिण योजनेअंतर्गत कोणत्याही स्वरूपाचे मोफत मोबाईलचे वाटप केले जात नाहीये.

Ladki Bahin Yojana Mobile Gift Form Online Apply

सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत नव्याने सांगण्यात आलेल्या मोफत मोबाईल गिफ्ट संदर्भात तुमचा एक भ्रम मी दूर करू इच्छितो.

लाडकी बहीण योजना मोबाईल गिफ्ट संदर्भात कोणत्याही स्वरूपाचा फॉर्म सुरू नाहीये.

सोबतच युट्युब वर वेगवेगळे व्हिडिओ येत आहेत, त्यामध्ये Ladki Bahin Yojana Mobile Gift Form संदर्भात माहिती दिली जात आहे. पण ती माहिती पूर्णतः खोटी आहे.

त्यामुळे अशा खोट्या माहिती प्रसार करणाऱ्या व्हिडिओ पासून महिलांनी दूर राहावे.

Ladki Bahin Yojana Mobile Gift Form Link

महाराष्ट्र शासनातर्फे Ladki Bahin Yojana Mobile Gift Form Link सुरू नाहीये. यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाचा शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे भूल थापांना बळी पडू नका.

मंत्रिमंडळातील एका आमदाराने त्याच्या मतदारसंघांमध्ये लाडक्या बहिणींना Mobile Gift दिले आहेत. त्यामुळेच या संदर्भातील मेसेज इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

राज्यातील सर्व भागात या प्रकारचे मोबाईल वाटप केले जात नाहीये, फक्त काही भागांमध्ये स्वतः आमदार स्वखर्चाने Mofat Mobile वाटप करत आहेत.

महाराष्ट्र शासनाने Ladki Bahin Yojana Mobile Gift संदर्भात कोणत्याही स्वरूपाची अशी योजना सुरू केलेली नाहीये. त्यामुळे कन्फ्युज होऊ नका, आणि कोणत्याही वेबसाईटवर किंवा पोर्टलवर तुमची पर्सनल माहिती देऊ नका.

Click to rate this post!
[Total: 17 Average: 4.2]

7 thoughts on “Ladki Bahin Yojana Mobile Gift Form Link | लाडक्या बहिणींना मोफत फ्री मध्ये मोबाईल फोन वाटप ?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top