Ladki Bahin Yojana 2100 Rs: लाडकी बहिणी योजने संदर्भात मोठी अपडेट आली आहे, बहिणींना सरकारने मोठा धक्का दिला आहे. आता लाडक्या बहिणींना योजनेचे 2100 रुपये पुढच्या वर्षी दिले जाणार आहेत.
बहिणींना तब्बल दहा महिने वाट पहावी लागणार आहे, या संदर्भात अधिकृत माहिती सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून देण्यात आली आहे.
महायुती जाहीरनाम्याचे प्रमुख सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात सूचक वक्तव्य केला आहे, इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी लाडके बहीण योजनेचे पैसे वाढीव स्वरूपात किंवा पासून मिळणार या संदर्भात माहिती दिली आहे.
Ladki Bahin Yojana: नवीन हप्ता कधी येणार आणि किती येणार? 1500 की 2100 जाणून घ्या
याच विषयी सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे आर्टिकल खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना आर्टिकल शेअर करा सोबतच माहिती काळजीपूर्वक वाचा.
Ladki Bahin Yojana 2100 Rs मिळणार नाही?
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार आता सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच लाडक्या वहिनींना योजनेचे वाढीव पैसे दिले जाणार नाहीत.
लाडकी बहीण योजनेचा वाढीव हप्ता देण्यासाठी खूप वेळ लागणार आहे, सरकार जसं स्थापन होईल तसं लगेच याचा निर्णय घेता येणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे.
शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 20,000 रुपये, केंद्राची नवीन योजना जाहीर!
यासोबतच लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पातून राखीव ठेवलेला 45 हजार कोटींचा निधी कमी पडत आहे, यापूर्वी 1500 प्रमाणे हा निधी ठरवण्यात आला होता परंतु आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करावी लागणार आहे.
2100 रुपये केव्हा पासून मिळणार?
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार जसे सुरुवातीला रक्षाबंधनला लाडकी बहीण मिळण्याचा पहिला हप्ता पडला होता, त्याप्रमाणे आता वाढीव 2100 रुपये चा हप्ता भाऊबीज ला पडणार असल्याचे सांगितले आहे.
म्हणजेच बघा आता भाऊबीज येण्यासाठी तब्बल दहा महिन्याचा कालावधी शिल्लक आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना आता सध्या 2100 रुपये मिळवण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
2025 मध्ये भाऊबीज 23 ऑक्टोबरला येत आहे, त्यामुळे 23 ऑक्टोबर 2025 नंतर लाडकी बहीण योजनेमध्ये बदल करून महिलांना प्रति महिना 2100 रुपये दिले जाणार आहेत.
रक्कम वाढवण्यासाठी उशीर का?
तर बघा लाडकी बहिणी योजनेचा हप्ता वाढवण्यासाठी सरकारकडे सध्या खूप सार्या अडचणी आहेत. कोणत्याही योजनेमध्ये बदल करायचा असेल तर तो बदल शासन निर्णय GR च्या माध्यमातून केला जातो, जीआर काढण्यासाठी बराच कालावधी लागतो, आणि यामध्ये अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे लाडकी बहिण योजनेसाठी अगोदर Allot केलेला निधी पुरेसा नाहीये.
या महिलांना मिळणार नाही 6वा हप्ता, तुम्हाला मिळेल का पहा !
या अगोदर 45000 करोड रुपये या योजनेसाठी राखीव ठेवले होते, परंतु आता हप्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे हे 45 हजार करोड रुपये अपुरे पडत असल्याने सध्या तरी 2100 रुपये देण्याचा जो निर्णय आहे तो लांबणीवर पडला आहे.
त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी हा खूप मोठा धक्का आहे, निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील लाडक्या बहिणी 2100 रुपयाच्या हप्त्याची वाट पाहत होत्या परंतु आता त्यांच्यासाठी ही खूप निराशादायक बातमी आहे.
परंतु या ठिकाणी जर राज्य सरकारने मार्च मध्ये अर्थसंकल्प जाहीर करताना लाडकी बहीण योजनेसाठी जास्त निधी दिला आणि हप्ता वाढवण्यासाठी जास्त प्रयत्न केले तर लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा जो वाढीव हप्ता आहे तो लवकर देखील मिळू शकतो.