Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा नवीन हप्ता कधी येणार याची सध्या खूप उत्सुकता लागून राहिली आहे. सोबत लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 करणार यामुळे तर महिला खूपच आनंदी होत आहेत.
याच संदर्भात सविस्तर अशी माहिती या आर्टिकल मध्ये मी दिली आहे, लाडकी बहीण योजनेचा नवीन हप्ता कधी येणार किती येणार? 1500 येणार की 2100 येणार? या तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर पोस्ट मध्ये दिले आहे. त्यामुळे पोस्ट काळजीपूर्वक वाचा, आणि इतर लाडक्या बहिणींना जरूर शेअर करा.
लाडकी बहीण योजनेचा नवीन हप्ता कधी येणार?
Ladki bahin yojana चा नवीन हप्ता हा डिसेंबर महिन्यात येणार आहे, आता सध्या अजून राज्यात सरकार स्थापन झालं नाहीये त्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागत आहे.
30 नोव्हेंबर पर्यंत सरकार स्थापन होणार आहे, त्यानंतर पुढच्या 15 दिवसांच्या आत म्हणजे 1 ते 15 डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणींना डिसेंबर चा 6वा हप्ता दिला जाणार आहे.
लाडकी बहिण योजना नवीन हप्ता तारीख जाहीर, केव्हा मिळणार येथून पहा
किती रुपये भेटणार, 1500 की 2100?
निवडणुकी पूर्वी महायुती द्वारे लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 हून 2100 करण्याची घोषणा केली होती, आता महायुती ला पूर्ण बहुमत मिळाल्यामुळे या घोषणेची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे.
पण डिसेंबर चा हा 6वा हप्ता 2100 रुपयांचा नाहीये, कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता अधिकृत पने वाढवण्यासाठी आधी शासन निर्णय GR काढावा लागतो त्याला खूप वेळ जातो, त्यामुळे डिसेंबर मध्ये तुम्हाला 1500 रुपयेच भेटणार आहेत.
एकदा का लाडकी बहीण योजना 2100 रुपये प्रति महिना अपडेट केलेला GR प्रसिद्ध झाला की मग नंतर जानेवारी 2025 पासूनचे सर्व हप्ते 2100 रुपयांचे दिले जाणार आहेत.