Pan Card 2.0: मित्रांनो पॅन कार्ड संबंधी एक महत्त्वाची अशी अपडेट आली आहे, आता केंद्र सरकार द्वारे पॅन कार्ड अपग्रेड केले जाणार आहेत.
पॅन कार्ड मध्ये आता खूप मोठे बदल होणार आहेत, त्यामुळेच केंद्राद्वारे हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पॅन कार्ड अधिक डिजिटलाइज करण्यासाठी, सोबतच नागरिकांची माहिती अधिक सिक्युअर करण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलले आहे.
पण तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला असेल आमच्याकडे जे जुने पॅन कार्ड आहे त्याचं काय होईल? तर काळजी करू नका याच संदर्भ सविस्तर अशी माहिती या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला सांगितले आहे.
सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ही पोस्ट वाचा, त्यासोबत तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना पण महत्त्वाच्या अशी माहिती मिळेल.
Pan Card 2.0 Update
आता पूर्वीचे जुने पॅन कार्ड जे आहेत त्या जागी नवीन पॅन कार्ड येणार आहेत. या संदर्भात अधिकृत अशी घोषणा करण्यात आली आहे.
तुम्हाला आता नवीन Pan 2.0 साठी अर्ज करावा लागणार आहे, जुन्या पॅन कार्ड ऐवजी हे नवीन Pan 2.0 आता वापरात येणार आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्र ने बदलले एफ डी वरील व्याजदर, नवीन व्याजदर येथून तपासा
जुने PAN Card बंद होणार का?
नाही, जुने पॅन कार्ड बंद होणार नाहीत. पूर्वीप्रमाणेच तुम्ही तुमचे जुने पॅन कार्ड वापरू शकता.
फक्त या ठिकाणी पॅन कार्ड मधील माहिती अपग्रेड करण्यात येणार आहे. सोबतच पॅन कार्ड मध्ये नवीन QR Code बसवला जाणार आहे.
जुने आणि नवीन दोन्ही पण Pan Card तुम्ही वापरू शकता, या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची अडचण येणार नाही.
पॅन कार्ड मध्ये काय बदल होणार?
पॅन कार्ड आता अपग्रेड केले जाणार आहेत, पॅन कार्ड मध्ये नवीन क्यूआर कोड ऍड केला जाणार आहे. यामुळे पॅन कार्ड अधिक सिक्युअर आणि सुरक्षित होणार आहे.
या अगोदर पॅन कार्ड संदर्भात वेगवेगळे स्कॅम होत होते, त्याला आळा बसावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन पॅन मुळे अनेक गोष्टी आता सुलभ होणार आहेत, पॅन डेटा अधिक सुरक्षित होणार आहे. याच सोबत युजर्सचा संपूर्ण डेटा सरकारद्वारे कंट्रोल केला जाणार आहे, जेणेकरून नागरिकांचे कोणत्याही स्वरूपाची माहिती लिक होणार नाही.
या बँका देत आहेत FD वर 9% व्याज, बँकाची नावे येथून जाणून घ्या
New Pan Card 2.0 साठी पैसे द्यावे लागतील का?
अनेक नागरिकांच्या मनात प्रश्न आहे आता पॅन कार्ड अपडेट करायचा असेल, तर त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील का?
तर बघा तुम्हाला Pan Card 2.0 साठी कोणत्याही स्वरूपाचे पैसे खर्च करण्याची गरज नाही.
ही प्रक्रिया मोफत असणार आहे, केंद्राद्वारे पॅन कार्ड साठी स्पेशल पोर्टल बनवले जाणार आहे, त्याच पोर्टलवरून तुम्ही मोफत स्वरूपात पॅन कार्ड अपग्रेड करू शकता.
पॅन कार्ड साठी कोणत्याही स्वरूपाचे पैसे मोजावे लागणार नाहीत, पण तुम्हाला त्याची Hard Copy मिळवण्यासाठी मात्र 50 रुपये द्यावे लागणार आहेत.
ऑनलाईन स्वरूपात Pan 2.0 साठी अर्ज केला की नंतर मग Physical Pan Card 2.0 साठी तुम्हाला 50 रुपये भरायचे आहेत, त्यानंतर तुमच्या घरी पोस्टाने पॅन कार्ड पोहोचती करण्यात येणार आहे.
कर्ज देण्यासाठी बँका मागे लागतील, फक्त हे काम करा
पॅन कार्ड अपडेट करता येईल का?
पॅन कार्ड साठी एक वेगळे पोर्टल सुरू केले जात आहे त्यामुळे आता बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असेल फ्री मध्ये पॅन कार्ड अपडेट करता येईल का?
तर मित्रांनो तुम्हाला या नवीन पोर्टल द्वारे पॅन कार्ड मोफत स्वरूपात अपडेट करता येणार आहे, कोणत्याही स्वरूपाचे शुल्क या ठिकाणी आकारले जाणार नाही. पॅन कार्ड वर तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि इतर माहिती मोफत अपडेट करता येणार आहे.