लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्कॉलरशिप 2024 – ऑनलाईन फॉर्म, Last Date | Lokshahir Annabhau Sathe Scholarship

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 2 Average: 4]

Lokshahir Annabhau Sathe Scholarship: बारावी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे, शासनाद्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे.

अण्णाभाऊ साठे स्कॉलरशिप योजने मध्ये विद्यार्थ्यांना 25,000 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. या शिष्यवृत्ती योजनेसाठी ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे, त्यांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरावा लागणार आहे.

Lokshahir Annabhau Sathe Scholarship साठी कोणते विद्यार्थी पात्र असणार? किती रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार? Form कसा भरायचा? Scholarship ची Last Date काय आहे? Registration, Apply Link, Online Form या सर्व बाबी आर्टिकल मध्ये सांगितल्या आहेत.

विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी एक प्रकारे सरकार द्वारे ही आर्थिक मदत केली जात आहे, ज्यामुळे गुणवंत हुशार विद्यार्थी दुर्बल आर्थिक परिस्थिती वाचून शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नये, हा या योजनेचा हेतू आहे.

Lokshahir Annabhau Sathe Scholarship 2024

शिष्य्वृतीचे नावLokshahir Annabhau Sathe Scholarship
सुरुवातपुणे महानगरपालिका
उद्देशगरीब (गुणवंत) विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे.
लाभ25,000 रुपयाची आर्थिक सहाय्यता
लाभार्थीपुणे महानगरपलिका हद्दीतील 12वी पास विद्यार्थी
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत पोर्टलpmc.gov.in
Helpline Number18001030222

Lokshahir Annabhau Sathe Scholarship Objective

Lokshahir Annabhau Sathe Scholarship
  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. 
  • गुणवंत हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे. 
  • आर्थिक दुर्बल गटातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे.
  • पैशाच्या अभावी गुणवंत विद्यार्थ्यांची होणारी शालेय गळती थांबवणे.

Lokshahir Annabhau Sathe Scholarship Elegibility Criteria

मुख्यमंत्री वयोश्री योजना, येथून अर्ज करा

  • अर्जदार विद्यार्थी हा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत राहणारा रहिवासी असावा. 
  • विद्यार्थ्याने पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील शासनमान्य विद्यापीठात किंवा शाळेत शिक्षण घेतले असावे.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थ्याने शैक्षणिक वर्ष 2024 (फेब्रुवारी-मार्च) मध्ये 12वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाकिमान 80% गुण असावेत.
मागासवर्गीय किंवा रात्रशाळेतील विद्यार्थ्यांनाकिमान 70% गुण असावेत.
कचरावेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या असंघटित कष्टकरी कामगारांच्या मुलांनाकिमान 65% गुण असावेत.
दिव्यांग अपंग विद्यार्थ्यांनाकिमान 40% गुण असावेत.

Lokshahir Annabhau Sathe Scholarship Documents List

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • वयाचा पुरावा (जन्मदाखला, TC, बोनाफाईड)
  • कुटुंबाचे रेशन कार्ड
  • बँक खाते पासबुक
  • अर्जदाराचे हमीपत्र
  • मागासवर्गीय असल्यास जातीचे प्रमाणपत्र
  • अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला
  • महाविद्यालयाचे प्रवेशपत्र आणि प्रवेश पावती
  • महाविद्यालयाचे शिफारसपत्र
  • पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत वास्तव्य असल्याचा पुरावा (मनपा टॅक्स पावती, लाईटबिल)

Lokshahir Annabhau Sathe Scholarship 2024 Application Form

Lokshahir Annabhau Sathe Scholarship 2024

पुणे महानगरपालिका तर्फे PMC scholarship मध्ये एकूण दोन शिष्यवृत्ती योजना सुरु केल्या आहेत, त्यामध्ये abul kalam azad scholarship आणि Lokshahir Annabhau Sathe Scholarship या दोन योजना आहेत.

यामध्ये अबुल कलाम आझाद स्कॉलरशिप योजना 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी आहे, तर अण्णाभाऊ साठे स्कॉलरशिप योजना हि 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी आहे.

याठिकाणी मी “अण्णाभाऊ साठे स्कॉलरशिप योजना” साठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म कसा भरायचा? याची स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे, माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि त्याप्रकारे फॉर्म भरा.

अधिकृत वेबसाईटpmc.gov.in
ऑनलाईन अर्जApply Online Link
योजनेचे जाहीर प्रकटनयेथून वाचा
  • सर्वात पहिल्यांदा अर्जदार विद्यार्थ्यांना dbt.pmc.gov.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे. 
  • पोर्टल वर आल्यानंतर तिथे तुम्हाला “नवीन नोंदणी” या बटणावर क्लिक करून तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • तुमच्यासमोर नोंदणीचा एक फॉर्म येईल, त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या पालकांचे पूर्ण Details टाकायचे आहेत.
  • User ID आणि Password तयार केल्यानंतर तुम्हाला लॉगिन करायच आहे.
  • लॉगइन केल्यानंतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना “मागासवर्गीय कल्याणकारी योजना” तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना “युवक कल्याणकारी योजना” अंतर्गत फॉर्म Open करायचा आहे.
  • फॉर्ममध्ये जी काही माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्यायची आहे.
  • फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची सर्व शैक्षणिक माहिती, कुटुंबाची माहिती, वैयक्तिक माहिती, बँकेची डिटेल्स अशी सर्व काही इन्फॉर्मेशन टाकायची आहे.
  • या ठिकाणी एक लक्षात घ्या तुम्हाला Lokshahir Annabhau Sathe Scholarship साठी Application Form भरताना तुमचे सर्व ओरिजनल डॉक्युमेंट स्कॅन करून टाकायचे आहेत. 
  • आवश्यक अशा सर्व डॉक्युमेंट ची हार्ड कॉपी देखील तयार करून ठेवायची आहे, ही कागदपत्रे विद्यार्थ्यांची निवड झाल्यावर तुम्हाला सादर करावी लागतात.
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्कॉलरशिप चा फॉर्म भरून झाल्यावर, तुम्हाला तो एकदा बरोबर चेक करायचा आहे. सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करायची, आणि त्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे.

जर तुम्ही चुकीने तुमचा फॉर्म Save As Draft केला किंवा Submit केला नाही, तर तुमच्या फॉर्म ची दखल घेतली जाणार नाही.

9वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांना महिन्याला 1000 रुपये! येथून अर्ज करा

सोबतच जर तुम्हाला Lokshahir Annabhau Sathe Scholarship Yojana Scheme संबंधी अधिक माहिती जर जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन समाज विकास विभागातील कर्मचाऱ्यांकडे संपर्क साधू शकता.

Lokshahir Annabhau Sathe Scholarship 2024 Last Date

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना साठी पुणे महानगरपालिकेच्या (PMC Municipal Corporation) अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे.

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांचा फॉर्म @dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरायचा आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख08 ऑगस्ट 2024
अर्जाची Last Date30 सप्टेंबर 2024
अर्ज करण्यासाठी मुदत54 दिवस

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया हि दिनांक 08 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाली आहे, विद्यार्थ्यांना दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत त्यांचा फॉर्म भरायचा आहे. Online Application Form भरण्यासाठी 54 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 

मुदतवाढ मिळेल म्हणून हलगर्जीपणा करू नका, अर्ज करून टाका, 25 हजार रुपयांचा सवाल आहे!

Lokshahir Annabhau Sathe Scholarship FAQ

What is the Scholarship for 12th pass in Pune?

बारावी पास विद्यार्थ्यांसाठी पुणे महानगरपालिकेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे.

What are the benefits of Lokshahir Annabhau Sathe Scholarship?

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्कॉलरशिप योजना अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. 

How to apply for Lokshahir Annabhau Sathe Scholarship?

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक स्कॉलरशिप योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, ऑनलाइन फॉर्म कुठे भरायचा? कसा भरायचा? याची स्टेप बाय स्टेप माहिती वर आर्टिकल मध्ये दिली आहे.

What is the last date of Lokshahir Annabhau Sathe Scholarship?

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2024 आहे.

Click to rate this post!
[Total: 2 Average: 4]

Leave a Comment