Chhatrapati Rajaram Maharaj Sarthi Scholarship: सारथी संस्थेद्वारे 9 वी, 10 वी, 11 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव अशी योजना सुरू केली आहे. त्यानुसार आता शाळकरी मुलांना शिक्षणासाठी दर महिन्याला 1,000 रू मिळणार आहेत.
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती असे या योजनेचे नाव आहे. Scholership Scheme असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
बऱ्याच लोकांना या योजनेची माहिती अद्याप नाहीये, त्यामुळे खूप विद्यार्थी या Chhatrapati Rajaram Maharaj Sarthi Scholarship योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून या योजनेचा फायदा सर्वांना मिळेल.
मराठा, कुणबी, कुणबी – मराठा, मराठा – कुणबी जातीतील 9 वी, 10 वी, 11 वी आणि 12 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मराठा बांधवांना ही पोस्ट शेअर करा.
Chhatrapati Rajaram Maharaj Sarthi Scholarship 2024
मराठा समाजासाठी सारथी संस्थेने सुरू केलेली एक विशेष अशी योजना म्हणजे, छत्रपती राजाराम महाराज सारथी स्कॉलरशिप योजना. या योजने द्वारे गरीब मराठा, कुणबी लक्षित समाजाच्या मुलांचे भले व्हावे, त्यांना शिक्षण घेता यावे आणि शिक्षण प्रवाहातून मुलांची गळती कमी व्हावी हेच या योजनेचे मूळ उद्दिष्ट आहे.
Chhatrapati Rajaram Maharaj Sarthi Scholarship Yojana साठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी बऱ्याच अटी आणि शर्ती आहेत, सोबत फॉर्म देखील भरणे सोपे नाही, त्यामुळे या आर्टिकल मध्ये फॉर्म भरण्याची जी माहिती दिली आहे, ती एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या आणि त्यानंतर त्याप्रकारे अर्ज करून टाका.
Help Tabel
योजनेचे नाव | Chhatrapati Rajaram Maharaj Sarthi Scholarship |
अंमलजावणी | महाराष्ट्र |
उद्देश | विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, आर्थिक मदत करणे. |
लाभ | प्रत्येक महिन्याला 1000 रुपये |
लाभार्थी | मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी जातीतील 9 वी, 10 वी, 11 वी आणि 12 वी चे विद्यार्थी |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
Link Table
अधिकृत संकेतस्थळ | @sarthi-maharashtragov.in |
अर्जाचा नमुना, मुख्याध्यापक/ प्राचार्य फॉर्म | डाऊनलोड करा |
ऑनलाईन माहिती भरण्याची लिंक:
सूचना: विद्यार्थ्यांना फक्त ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे, बाकी ऑनलाईन माहिती अधिकारी भरणार आहेत.
Date Table
परिपत्रक प्रसिद्ध होण्याची तारीख | 09 जुलै 2024 |
अर्ज करण्याची सुरुवात | 10 जुलै 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 ऑगस्ट 2024 |
Chhatrapati Rajaram Maharaj Sarthi Scholarship Benefits
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज Approve झाले आहेत त्यांना खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे.
सारथी संस्थेद्वारे स्कॉलरशिप योजनेसाठी निवड झाल्यानंतर 9 वी, 10 वी, 11 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 1000 रू. दिले जातात.
स्कॉलरशिप रक्कमेत वेळोवेळी बदल होतो, त्यामुळे कमी जास्त करून महिन्याला 800 ते 1000 पर्यंत अशी स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळते. सध्या 1000 रू. प्रति महिना या दराने स्कॉलरशिप दिली जात आहे.
Chhatrapati Rajaram Maharaj Sarthi Scholarship New Update
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेमध्ये चालू शैक्षणिक वर्षासाठी काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये काही मुख्य बदल खालीलप्रमाणे आहेत.
12 वी च्या विद्यार्थ्यांना पण छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार.
विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती दर महिन्याला 800 रू. वरून 1000 रू. करण्यात आली.
Chhatrapati Rajaram Maharaj Sarthi Scholarship Elegibility Criteria
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी वेगवेगळे पात्रता निकष जारी करण्यात आले आहेत. यात मुख्य बाब म्हणजे इयत्ते नुसार निकष सांगण्यात आले आहेत. म्हणजे जर विद्यार्थी 9 वी मध्ये असेल तर त्याच्या साठी अटी या वेगळ्या असणार आणि जर विद्यार्थी 10 वी, 11 वी किंवा 12 वी मध्ये असेल तरी त्यांच्या साठी पण Elegibility Criteria वेगळा असणार आहे.
✅ पात्रता निकष:
इयत्ता 9 वी साठी :-
- केंद्र सरकारची NMMS शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण, पण लाभ न मिळालेले विद्यार्थी.
- मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी समाजातील विद्यार्थी.
इयत्ता 10 वी साठी :-
- 10 वी मध्ये नियमित शिकत असणारे विद्यार्थी.
- मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी समाजातील विद्यार्थी.
- इयत्ता 9 वी च्या वार्षिक परीक्षेत 55% पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी.
इयत्ता 11 वी साठी :-
- विद्यार्थी हा 11 वी मध्ये नियमित शिकत असावा.
- विद्यार्थी हा मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी समाजातील असावा.
- 10 वी च्या बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्याला 60% पेक्षा जास्त गुण असावेत.
- विद्यार्थी हा पहिल्या प्रयत्नात 10 वी पास झालेला असावा.
इयत्ता 12 वी साठी :-
- विद्यार्थी हा 12 वी मध्ये चालू वर्षात नियमित शिकत असावा.
- विद्यार्थी हा मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी समाजातील असावा.
- विद्यार्थ्याला 11 वी मध्ये 55% पेक्षा गुण मिळालेले असावेत.
- विद्यार्थ्याने पहिल्या प्रयत्नात 11 वी उत्तीर्ण केलेली असावी.
योजनेच्या अटी आणि शर्ती
- विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे (आई – वडिलांचे) एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 3,50,000 रू. पेक्षा कमी असावे.
- फक्त वडिलांचे एकूण वार्षिक उत्पन्न हे 1,50,000 रू. पेक्षा कमी असावे.
- विद्यार्थी विनाअनुदानित Private शाळेत शिकत नसावेत.
- विद्यार्थी केंद्रीय विद्यालयात शिकत नसावेत.
- जवाहर नवोदय विद्यालय आणि सैनिकी शाळेत विद्यार्थी शिकत नसावेत.
- विद्यार्थी शासकीय वसतिगृहात राहत नसावा, सोबत वसतीगृहाच्या भोजन, शैक्षणिक सुविधांचा लाभ घेत नसावा.
Chhatrapati Rajaram Maharaj Sarthi Scholarship Document List
- विद्यार्थ्याचे आधार कार्ड
- विहित नमुन्यात शिष्यवृत्ती मागणी अर्ज
- मुख्याध्यापक/ प्राचार्याचे (सहिसह) शिफारस पत्र
- तहसील मधून काढलेले उत्पन्न प्रमाणपत्र (2024-25 वर्षाचे)
- विद्यार्थ्याचे बँक खाते पासबुक (फक्त राष्ट्रीयकृत बँक)
- NMMS परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक
- मागील शैक्षणिक वर्षाचे गुणपत्रक
Chhatrapati Rajaram Maharaj Sarthi Scholarship Form
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात सादर करायचा आहे, यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा फॉर्म स्वतः संबंधित कार्यालयात नेऊन द्यावा लागेल, किंवा पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल.
Chhatrapati Rajaram Maharaj Sarthi Scholarship योजेनचे सर्व कागदपत्रे तयार करून झाले, की मग तालुका स्तरिय गट शिक्षणाधिकारी यांच्या कडे सुरुवातीला फॉर्म सादर करायचा आहे.
एकदा अर्ज सबमिट केला की नंतर त्या फॉर्मची छाननी व पडताळणी गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत केली जाते. त्यानंतर Approved झालेले अर्ज माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कडे पाठवले जातात, माध्यमिक शिक्षणाधिकारी पुढे तेच फॉर्म मा. व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, Sarthi Pune महाराष्ट्र 411004 या पत्त्यावर पाठवले जातात.
शेवटी सारथी द्वारे अर्ज पुन्हा Recheck करून योग्य पात्र विद्यार्थी निवडले जातात, त्यानंतर अशा निवडक विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट यादी बनवली जाते, ती यादी सारथी पोर्टल वर प्रकाशित केली जाते. जर यादी मध्ये तुमचे नाव आले तर तुम्हाला दरमहा 1000 रू. याप्रमाणे वर्षाचे 12 हजार रुपये शिष्यवृत्ती स्वरूपात दिले जातात.
योजनेचे FAQ
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना साठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत?
मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा या जातीतील 9 वी, 10 वी, 11 वी आणि 12 वी मध्ये चालू शैक्षणिक वर्षात शिकणारे विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना साठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
योजनेसाठी सदर विद्यार्थ्यांना ऑफलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, अर्जाचा नमुना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार घेऊन तो भरायचा आहे, आणि त्याला आवश्यक कागदपत्रे लावून तो फॉर्म तालुकास्तरीय गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे.
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्जाची शेवटची तारीख कोणती?
सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 ऑगस्ट 2024 आहे, दिलेल्या मुदतीच्या आगोदर अर्ज करायचा आहे, अर्ज करण्यास उशीर झाला तर तुमचा अर्ज पुढे पाठवला जाणार नाही.
नमस्कार माझ नाव श्रीकांत शिंदे, मागच्या 2 वर्षा पासून मी ब्लॉगिंग करतोय. महा हेल्पलाईन पोर्टल बनवण्याच्या मागे माझ एकच उद्देश आहे, तो म्हणजे महाराष्ट्र योजना, केंद्र योजना आणि अशाच विविध शासनाच्या स्कीम्स लोकांपर्यंत पोहोचवणे.
I am student of 11 th class from khambada
Good post
Thanks 🙏
छान👏✊👍
Thanks 🙂