बांधकाम कामगारांना मिळणार ₹ 5000 दिवाळी बोनस, पैसे कसे मिळवायचे पहा | Bandhkam Kamgar Diwali Bonus

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 6 Average: 3.8]

Bandhkam Kamgar Diwali Bonus: बांधकाम कामगार योजना अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना आता दिवाळी बोनस ₹ 5000 रुपये मिळणार आहे.

इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024 साठी मंडळाने निधी ची तरतूद देखील केली आहे. दिवाळी आधी सर्व बांधकाम कामगारांना हे बोनस चे पैसे भेटणार आहेत.

परंतु या मध्ये काही अटी आणि शर्ती देखील सांगण्यात आल्या आहेत. त्यानुसार जे कामगार पात्र असतील केवळ त्यांना 5000 रुपये मिळणार आहेत.

याचीच सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये मी दिली आहे, कोणत्या कामगारांना बोनस मिळणार? नाही मिळाला तर काय करावं लागणार, माहिती महत्वाची अशी आहे, काळजीपूर्वक वाचा आणि Bandhkam Kamgar Diwali Bonus चा लाभ तुम्ही पण घ्या.

Bandhkam Kamgar Diwali Bonus 2024

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या Bandhkam Kamgar Yojana अंतर्गत सर्व पात्र लोकांना हा दिवाळी बोनस चा लाभ देण्यात येत आहे.

यासाठी ज्या लोकांनी बांधकाम कामगार योजना साठी अर्ज केला आहे केवळ अशेच लोक पात्र असणार आहेत.

महिलांना 3000 रुपये दिवाळी बोनस, पैसे मिळवण्यासाठी क्लिक करा

बांधकाम कामगार योजना दिवाळी बोनस अटी आणि शर्ती

  • बांधकाम कामगार योजना मध्ये व्यक्ती नोंदणीकृत असावा.
  • त्याची प्रोफाइल Active असावी.
  • बांधकाम कामगार कार्डचे Renewal केलेले असावे.
  • बँक खाते बांधकाम कामगार योजनेला लिंक असावे.

बांधकाम कामगार दिवाळी बोनस 5000 मिळाला नाही तर काय करावे?

जर तुम्हाला बांधकाम कामगार दिवाळी बोनस भेटला नाही तर तुम्हाला mahabocw.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे.

तिथे तुम्हाला तुमच्या प्रोफाइल मध्ये लॉगिन करायचे आहे. यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर वापरायचा आहे.

लॉगिन झाल्यावर प्रोफाइल मध्ये जाऊन एकदा बांधकाम कामगार कार्ड Active आहे की नाही चेक करा.

सोबत प्रोफाइल मध्ये बँक खाते जोडले आहे की नाही, याची पण चाचपणी करा.

जर बँक खाते जोडले नसेल तर ते तात्काळ लिंक करून घ्या, लिंक केल्याशिवाय तुम्हाला Bandhkam Kamgar Diwali Bonus भेटणार नाही.

Click to rate this post!
[Total: 6 Average: 3.8]

Leave a Comment