Ladka Bhau Yojana 2024: तरुणांना महिन्याला 10,000 रू. मिळणार, लगेच येथून फॉर्म भरा

Ladka Bhau Yojana 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Ladka Bhau Yojana 2024: राज्य शासनामार्फत लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा GR प्रसिद्ध झाला आहे, सोबत फॉर्म देखील सुरू झाले आहेत.

या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Ladka Bhau Yojana 2024 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याची माहिती देणार आहे, सोबत आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष आणि इतर माहीती पण आर्टिकल मध्ये दिली आहे.

अधिक माहिती साठी ग्रुप जॉईन करा

Ladka Bhau Yojana 2024

योजनेचे नावLadka Bhau Yojana Maharashtra
सुरुवातमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उद्देशतरुणांना आर्थिक सहाय्य करणे.
लाभमहिन्याला 10,000 रुपये
लाभार्थीराज्यातील सर्व पात्र तरुण मुले
अधिकृत वेबसाईटrojgar.mahaswayam.gov.in

Ladka Bhau Yojana पैसे किती मिळणार?

शिक्षणविद्यावेतन
१२ वी पासरु. ६,०००/-
आय.टी.आय/ डिप्लोमा रु. ८,०००/-
पदवीधर/ पदव्युत्तररु. १०,०००/-

Ladka Bhau Yojana 2024 Qualification Details

  • उमेदवाराचे वय हे 18 ते 35 वर्षे असावे.
  • उमेदवाराने 12 वी, डिप्लोमा किंवा डिग्री पर्यंत शिक्षण घेतलेले असावे.
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

केवळ या तीन अटी लाडका भाऊ योजने साठी सांगण्यात आल्या आहेत, बाकी कोणत्याही अटी नाहीत. त्यामुळे तुम्ही जर वरील अटित येत असाल तर तात्काळ फॉर्म भरून टाका.

Ladka Bhau Yojana 2024 Document List

  • आधार कार्ड
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी

वर सांगितलेले सर्व कागदपत्रे हे फॉर्म भरताना अपलोड करावे लागतात, सोबत त्यांची माहिती देखील अर्जामध्ये भरावी लागते, त्यामुळे वर दिलेले सर्व Documents अर्ज भरताना जवळ ठेवा.

Ladka Bhau Yojana 2024 Apply Online

लाडका भाऊ योजना साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या Maha Swaym या पोर्टल वर जायचे आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा, आणि त्या प्रकारे अर्ज सादर करा.

  1. सुरुवातीला @rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईट वर यायचे आहे.
  2. साईट वर आल्यानंतर तेथे तुम्हाला पहिल्यांदा तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
  3. रजिस्ट्रेशन झाले की लॉगिन करून, लाडका भाऊ योजना साठी Apply करायचं आहे.
  4. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, या स्वरूपात लाडका भाऊ योजना राबवली जात आहे.
  5. योजनेचा फॉर्म Open झाला की नंतर तुम्हाला फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्यायची आहे.
  6. वर सांगितलेले सर्व कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करायचे आहेत, नंतर एकदा फॉर्म तपासून पाहायचा आहे. शेवटी अर्ज सबमिट करून टाकायचा आहे.

एकदा Ladka Bhau Yojana 2024 Apply Online Link वर क्लिक करून वरील सूचनांचे पालन करून अर्ज सादर केला, की नंतर तुम्हाला mahaswayam portal द्वारे अधिकृत माहिती ईमेल किंवा SMS वर कळवली जाईल.

एकदा का तुमचा अर्ज Approve झाला की तुम्हाला लगेच प्रशिक्षणासाठी बोलवले जाईल, तेथे तुम्हाला 6 महिन्याची ट्रेनिंग दिली जाईल, सोबत तुम्हाला सरकार द्वारे विद्यावेतन सुद्धा सुरू राहील.

Ladka Bhau Yojana संबंधी जर तुम्हाला अजून अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर या पोस्ट खाली कमेंट करा, मी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देईल.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

18 thoughts on “Ladka Bhau Yojana 2024: तरुणांना महिन्याला 10,000 रू. मिळणार, लगेच येथून फॉर्म भरा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top