Maharashtra GR PDF Download – QR Code, New Website

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

महाराष्ट्र शासनाने Gr साठी नवीन वेबसाईट लॉन्च केली आहे, आता सर्व Maharashtra GR हे याच नव्या वेबसाईट वर येणार आहेत. खास बाब म्हणजे आता यावेळी तुम्हाला QR Code वरून तुमच्या मोबाईल वर GR Download करता येणार आहे. त्याच विषयी आपण माहिती पाहणार आहोत, सोबत नवीन Maharashtra gr website कोणती आहे त्याची लिंक काय आहे हे पण जाणून घेणार आहोत.

शासकीय कामे अधिकृतपणे अमलात आणण्यासाठी सरकार GR म्हणजेच शासन निर्णय हे प्रसिद्ध करत असते. शासन निर्णय आधारेच सर्व शासकीय कामे होत असतात, पण आता याच GR ची अधिकृत वेबसाईट बदलण्यात आली आहे. आगोदर ची वेबसाईट बंद करून आता नवीन वेबसाईट सरकारने लॉन्च केली आहे.

Maharashtra GR New Website

राज्य सरकारने जुनी GR ची वेबसाईट बंद करून, आता @gr.maharashtra.gov.in मॉडर्न वेबसाईट बनवली आहे. या नव्या वेबसाईटचा फील आणि डिझाईन क्लीन आणि सुटसुटीत असा आहे.

New website
gr.maharashtra.gov.in

यावरील लिंक करून तुम्ही Maharashtra GR New Website वर जाऊ शकता. वरील लिंक डायरेक्ट स्वरूपाची आहे, लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही थेट maharashtra gr च्या वेबसाईट वर पोहोचाल.

gr.maharashtra.gov.in या नव्या वेबसाईट ची डिझाईन पांढऱ्या थीम मध्ये केलेली आहे, सोबतच gr maharashtra gov in वेबसाईटचा लुक देखील मॉडर्न स्वरूपाचा आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेबसाईट मध्ये काही नवीन ऑप्शन ऍड करण्यात आलेले आहेत.

Maharashtra GR New Website 1
Maharashtra GR New Website 2

Maharashtra GR QR Code

यामध्ये QR Code हा ऑप्शन सर्वात महत्त्वाचा आहे, क्यू आर कोड च्या माध्यमातून आता नागरिकांना प्रत्येक जीआर चा किंवा स्वतः जनरेट करता येणार आहे आणि तो क्यू आर शेअर देखील करता येणार आहे.

कोणत्याही शासन निर्णयाचा QR Barcode जनरेट केल्यानंतर, जर तुम्ही कोणाला शेअर केला तो क्यू आर स्कॅन करून कोणी पण तो जीआर डाऊनलोड करू शकतो.

Maharashtra GR New Website 3

क्यू आर कोड च्या माध्यमातून शासन निर्णय डाऊनलोड करणे सेव करणे अजून सोपे होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अगोदर gr शोधणे खूप अवघड जायचे, परंतु आता या नव्या वेबसाईट द्वारे काही क्षणात तुम्ही शासनाचा कोणता पण जीआर काढू शकता.

Maharashtra GR PDF Download

शासनाद्वारे प्रसिद्ध केलेल्या gr ची pdf आता मोबाईल वरून सहज पणे डाऊनलोड करता येणार आहे. या अगोदर जीआर डाऊनलोड करण्यासाठी कोणत्या स्वरूपाचा वेगळा ऑप्शन नव्हता, परंतु आता जीआर डाऊनलोड साठी केवळ डाउनलोड चा ऑप्शन नाही तर क्यूआर कोड चा ऑप्शन देखील देण्यात आलेला आहे.

यासोबतच नागरिकांना महाराष्ट्र शासन निर्णय (Maharashtra GR) पाहण्यासाठी फिल्टर देखील लावता येणार आहे, म्हणजेच डिपार्टमेंट नुसार, टायटल नुसार, तारखेनुसार आणि कीवर्डनुसार नागरिकांना कोणताही जीआर शोधता येणार आहे. जीआर कितीही जुना असेल तरीदेखील तुम्हाला त्याची तारीख टाकून, किंवा एखादा त्याविषयीचा शब्द टाकून देखील तुम्हाला या वेबसाईट द्वारे gov gr फाईंड करता येणार आहे.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Comment