सोयाबीन कापूस अनुदान योजना 2024 | Soyabin Kapus Anudan Yojana Maharashtra

Soyabin Kapus Anudan Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 8 Average: 4.1]

Soyabin Kapus Anudan Yojana: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे, आता राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत 2023-24 खरीप हंगामाचे पैसे दिले जाणार आहेत. 

ज्या शेतकऱ्यांनी कापूस किंवा सोयाबीन हे पीक लावले असेल त्यांना शासन पैसे देणार आहे. या संदर्भात अधिकृत शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आलाय. 

जर तुम्ही तुमच्या शेतात सोयाबीन किंवा कापूस लावला असेल, तर तुम्हाला पण Soyabin Kapus Anudan Yojana चा लाभ मिळू शकतो.

सोयाबीन आणि कापूस अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार? लाभ कसा मिळवायचा? त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? याची सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे, माहिती महत्त्वाचे असल्यामुळे कृपया आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.

सोयाबीन कापूस अनुदान यादी Download करा

Soyabin Kapus Anudan Yojana Maharashtra

महाराष्ट्र शासन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत एक महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे.

केवळ कापूस आणि सोयाबीन पिकासाठी शासनाद्वारे अनुदान दिले जाणार आहे, राज्य शासनामार्फत Soyabin Kapus Anudan साठी दिनांक 08 ऑगस्ट 2024 रोजी अधिकृत GR प्रसिद्ध करण्यात आला आहे.

शासन निर्णय GR ची अंमलबजावणी करण्यासाठी कृषी विभागामार्फत कृषी साहाय्यकाची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Soyabin Kapus Anudan पैसे किती मिळणार?

सोयाबीन कापूस अनुदानासाठी शेतकऱ्यांना 2023-24 खरीप हंगामाच्या पीक विम्याचे अनुदान स्वरूपात पैसे मिळणार आहेत. 

ज्या शेतकऱ्यांनी या हंगामामध्ये कापूस किंवा सोयाबीन हे पीक घेतले आहे त्यांना त्याच्या शेतजमिनी नुसार अनुदान रक्कम दिले जाणार आहे. 

अनुदानाची रक्कम ही हेक्टरी 5,000 रुपये याप्रमाणे असणार आहे. प्रती हेक्टर 5,000 प्रमाणे शेतकऱ्यांना शासन मदत करणार आहे.

म्हणजे जर तुमच्याकडे दोन हेक्टर जमीन असेल तर तुम्हाला शासनाद्वारे एकूण आर्थिक मदत ही दहा हजार रुपयांची मिळणार आहे. 

कापूस किंवा सोयाबीन हे पीक मात्र शेतीमध्ये असणे अनिवार्य आहे, जर या वर्षी पीक नसेल तर काळजी घेण्याची काही गरज नाही, तुमच्या ई-पीक पाहणी नोंदीमध्ये गेल्या वर्षी कापूस किंवा सोयाबीन याची नोंद असावी, तरच तुम्हाला हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान मिळेल.

Kapus Soybean Anudan Yadi PDF

कापूस सोयाबीन अनुदान यादी शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेली आहे, जर तुम्हाला kapus soybean anudan yadi पहायची असेल किंवा Download करायची असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून soyabean kapus anudan yadi मिळवू शकता आणि यादी मध्ये तुमचे नाव पण पाहू शकता, म्हणजे तुम्हाला हे soyabean kapus anudan मिळेल कि नाही हे पाहता येईल.

  • सुरुवातीला तुम्हाला Kapus Soybean Anudan Yadi पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या अधिकृत @mh.disastermanagement.mahait.org या या पोर्टल ला भेट द्यायची आहे.
  • पोर्टल वर गेल्यावर तिथे तुम्हाला तुमचा Vk Number टाकायचा आहे. (हा Vk Number तुम्हाला kyc करताना दिला गेला होता.)
  • त्यानंतर Submit वर क्लिक करायचे आहे, क्लिक केल्यानंतर तुमचे Payment Status तुमच्या समोर प्रदर्शित होईल.
  • soyabean kapus anudan status मध्ये तुम्हाला तुमचे नाव दिसेल, त्यानंतर तुम्हाला कापूस सोयाबीन अनुदान मिळेल कि नाही याची पण माहिती दिसेल.
  • जर तुम्हाला तुमच्या पेमेंट स्टेट्स मध्ये Success दाखवत असेल तर तुम्हाला सोयाबीन कापूस अनुदान मिळेल, आणि जर fail किंवा reject दाखवत असेल तर मात्र तुम्हाला अनुदान भेटणार नाही.

Kapus Soybean Anudan Yadi पाहण्यासाठी क्लिक करा

Soyabin Kapus Anudan पात्रता निकष

सोयाबीन कापूस अनुदान योजनेसाठी अर्जदार शेतकरी हा शासनाने घालून दिलेल्या पात्रता निकषात येत असावा. 

  • शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • शेतकऱ्याने 2023-24 साठी पीक विमा भरलेला असावा.
  • शेतकऱ्याच्या शेती मध्ये कापूस किंवा सोयाबीन चे पीक असावे.
  • ई-पीक पाहणी पोर्टल वर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद असावी.
  • अर्जदार शेतकऱ्याच्या बँक खात्याला आधार लिंक असावे.

Soyabin Kapus Anudan Yojana अर्ज प्रक्रिया

सोयाबीन कापूस अनुदान योजनेसाठी अर्जदार उमेदवारांना ऑफलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, अर्ज कसा करायचा त्याची सविस्तर प्रक्रिया खालील प्रमाणे आहे. 

  • सुरवातीला तुम्हाला Soyabin Kapus Anudan Form Download करून घ्यायचा आहे.
  • त्यानंतर फॉर्म मध्ये सर्व आवश्यक माहिती भरून घ्यायची आहे.
  • सोयाबीन कापूस अनुदान साठी आवश्यक असे सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत जोडायचे आहेत.
  • फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर एकदा खात्री करून घ्यायची आहे, त्यानंतर कृषी विभागात जाऊन कृषी सहाय्यकाकडे अर्ज जमा करायचा आहे.

Soyabin Kapus Anudan Form PDF Download

सोयाबीन कापूस अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांना काही आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावे लागणार आहेत, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे कागदपत्रे म्हणजे संमतीपत्र आणि ना हरकत पत्र, हे सर्व Form तुम्हाला खाली दिलेल्या Download लिंक वर क्लिक करून मिळवता येतील.

Soyabin Kapus Anudan Document List

सोयाबीन कापूस अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी: 

  • संमती पत्र
  • नाहरकत पत्र (शेत जमीन सामायिक असल्यास)
  • शेतकऱ्याचे आधार कार्ड 
  • आधार लिंक असलेले बँक पासबुक
  • मोबाईल नंबर

तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी Soyabin Kapus Anudan Yojana Maharashtra संबंधीची माहिती, मला आशा आहे तुम्हाला या सोयाबीन कापूस अनुदान योजनेची माहिती आवडली असेल.

त्यामुळे तुमच्या इतर शेतकरी मित्रांना पण ही पोस्ट शेअर करा, जेणेकरून त्यांना पण अनुदान रक्कमेच्या लाभ मिळेल.

Click to rate this post!
[Total: 8 Average: 4.1]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top