E Peek Pahani Online: मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला ई-पीक पाहणी कशी करावी? या संदर्भात स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे.
खरीप हंगामाचा पिक विमा भरण्याची मुदत संपली असल्याने आता शासनाद्वारे आजपासून e-peek pahani ई-पीक पाहणी ची Online प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा पीक विमा भरला असेल त्यांना E Peek Pahani करणे अनिवार्य आहे. ई-पीक पाहणी केली नाही तर पीक विमा भेटत नाही, त्यामुळे जर तुम्हाला पीक विमा पाहिजे असेल तर E-Pik Pahani करून घ्या.
मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने e peek pahani kashi karavi 2024 याची माहिती या आर्टिकल मध्ये मी दिली आहे. स्टेप बाय स्टेप माहिती देण्यात आली आहे, सोबत E Peek Pahani App Download करण्यासाठी Link पण देण्यात आली आहे. सोपी प्रोसेस आहे, त्यामुळे 5 मिनिट वेळ काढून हि माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार तुमच्या शेतीची ई-पीक पाहणी करुन घ्या.
👉शेती साठी मोफत लाईट येथून मिळवा
E Peek Pahani Online Process
ई पीक पाहणी करण्यासाठी स्टेप फॉलो करा:
- सुरुवातीला तुम्हाला E Peek Pahani App Download करायचा आहे.
- ई पीक पाहणी ॲप ची लिंक खाली Help Table मध्ये दिली आहे.
- ॲप डाऊनलोड केल्यानंतर ॲप ला Open करा.
- त्यानंतर तुमचा महसूल विभाग निवडा.
- शेतकरी म्हणून लॉगिन करा या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा चालू मोबाईल नंबर प्रविष्ट करा.
- विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
- इतर आवश्यक माहिती भरून घ्या, शोधा बटण वर क्लिक करून खाते निवडा.
- खाते Open झाल्यावर त्यामध्ये पीक पेरणी ची माहिती भरा, शेतात जे पीक लावले आहे ते पीक निवडा.
- पुढे विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे.
- प्रत्यक्ष शेतात जायचे आहे, आणि त्यानंतर सातबारा नुसार पीक पाहणी करायची आहे.
- यामध्ये शेती पिकाची Live Photo काढायची आहे, अक्षांश आणि रेखांश बरोबर तुमच्या शेताचेच घ्यायचे आहे.
- उभ्या पिकाची फोटो अपलोड करायचा आहे, आडवी फोटो काढायची नाही.
- जेवढी तुमच्या नावे जमीन आहे त्यानुसार वरील प्रोसेस द्वारे ई पीक पाहणी करून घ्या.
- एकदा पिकाची फोटो अपलोड केली की नंतर E-Peek Pahani Application Submit करून टाकायचे आहे.
टीप : तुम्ही ज्या पिकाचा पीक विमा भरला आहे त्याच पिकची फोटो E Pik Pahani करताना अपलोड करायची आहे. जर तुम्ही दुसऱ्याच पिकाचा विमा उतरवला असेल तर Secrect सांगतो जवळच्या शेजाऱ्याच्या शेतात जर ते पीक असेल तर त्याची Live Photo काढून टाका. काहीच Problem येत नाही, बरेच शेतकरी सोयाबीन चा विमा भरतात, पण शेतात कापूस लावतात त्यामुळे अडचण वैगेरे काही येत नाही.
Yojana Help Tabel
E Pik Pahani Start Date | 01 ऑगस्ट 2024 |
E Pik Pahani Last Date | 15 सप्टेंबर 2024 |
E Pik Pahani Helpline Number | 02025712712 |
E Pik Pahani App | Download Link |
E Pik Pahani Last Date 2024
खरीप हंगाम 2024 साठी ई पीक पाहणी 01 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाली आहे, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यांना मोबाईल वरून ऑनलाईन स्वरूपात E Pik Pahani करता येणार आहे.
ई पीक पाहणी नोंदणी 2024 साठी शेवटची तारीख ही 15 सप्टेंबर 2024 आहे, दरवर्षी E Peek Pahani Last Date बदलत असते, यंदा 15 सप्टेंबर 2024 ही Last Date असणार आहे.
परंतु मागील E Peek Pahani चे निरीक्षण केले असता, दर वेळी शासन ई पीक पाहणी साठी मुदतवाढ देते. पण कधी कधी मुदतवाढ मिळेल किंवा नाही हे सांगता येत नाही, पीक पाहणी करण्यासाठी आता वेळ आहे, त्यामुळे लवकर तुमच्या शेती पिकांची पाहणी करून घ्या.
थोडक्यात वरील प्रमाणे तुम्ही E-Peek Pahani Online स्वरूपात करू शकता, मला आशा आहे तुम्हाला ई-पीक पाहणी कशी करायची? याची सविस्तर माहिती या आर्टिकल च्या मदतीने मिळाली असेल. आर्टिकल जर Helpful वाटले असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांना ही पोस्ट नक्की शेअर करा.
नमस्कार माझ नाव श्रीकांत शिंदे, मागच्या 2 वर्षा पासून मी ब्लॉगिंग करतोय. महा हेल्पलाईन पोर्टल बनवण्याच्या मागे माझ एकच उद्देश आहे, तो म्हणजे महाराष्ट्र योजना, केंद्र योजना आणि अशाच विविध शासनाच्या स्कीम्स लोकांपर्यंत पोहोचवणे.