शिंदे सरकार द्वारे आता महिलांना प्रत्येक वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. या संबंधी Mukhymantri Annapurna Yojana सुरू करण्यात आली आहे. योजनेचा GR प्रसिद्ध करण्यात आलाय, त्यामुळे आता महिलांना फ्री गॅस सिलेंडर योजना साठी फॉर्म भरता येणार आहे.
लाडकी बहीण योजना नंतर शासनाने महिलांसाठी सुरू केलेली Maharashtra Mukhymantri Annapurna Yojana 2024 ही मोठी लाभदायक अशी योजना आहे.
महागाई मुळे निरंतर वाढणाऱ्या गॅस सिलेंडर किंमती, आणि त्यामुळे कुटुंबाच्या बजेट मध्ये होणारी पोकळी एका अर्थाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना दूर करणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना साठी नक्की कोणत्या महिला पात्र आहेत? ऑनलाईन अर्ज कसा करायचा? कागदपत्रे कोणते लागणार? 3 मोफत गॅस सिलेंडर कसे मिळणार? याची संपूर्ण माहिती या लेखात मी दिली आहे. एकदा माहिती वाचा आणि त्याप्रकारे फॉर्म भरून अन्नपूर्णा योजना चा लाभ मिळवा.
Mukhymantri Annapurna Yojana 2024
योजनेचे नाव | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना |
घोषणा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
अंमलबजावणी | 30 जुलै 2024 |
उद्देश | गरीब महिलांना मोफत गॅस सिलेंडर देणे. |
लाभ | वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर |
लाभार्थी | उज्ज्वला योजना आणि माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला |
Mukhymantri Annapurna Yojana GR PDF
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना साठी महाराष्ट्र सरकार द्वारे दिनांक 30 जुलै 2024 रोजी अधिकृत शासन निर्णय GR प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यासंदर्भात X वर शासनाच्या Official Account वरून माहिती देखील देण्यात आली आहे.
Mukhymantri Annapurna Yojana GR PDF मध्ये योजनेची सविस्तर माहिती सांगितली आहे, लाभार्थ्यांची पात्रता, योजनेची कार्यपद्धती यांची माहिती GR मध्ये देण्यात आली आहे. सोबत महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना साठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा? याची माहिती दिली आहे.
👉 मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना GR येथून वाचा
Mukhymantri Annapurna Yojana Elegibility Criteria
Maharashtra Mukhymantri Annapurna Yojana साठी लाभार्थ्यांची पात्रता सांगितली आहे, ज्या महिला या निकषात येत असतील त्यांना Mofat Gas Cylinder Yojana चा लाभ मिळणार आहे.
- घरगुती गॅस जोडणी महिलेच्या नावाने असावी.
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना सदर योजनेसाठी पात्र असणार आहेत.
- Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana चे सर्व लाभार्थी या अन्नपूर्णा योजना साठी पात्र असणार आहेत.
- प्रति रेशनकार्ड केवळ एक लाभार्थी योजनेसाठी पात्र असणार.
- 14.2 Kg सिलेंडर च्या जोडणी वरच मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे.
Mukhymantri Annapurna Yojana Benefits
महाराष्ट्र अन्नपूर्णा योजना 2024 साठी ज्या महिला पात्र ठरल्या गेल्या आहेत, त्यांना खालील लाभ मिळणार आहेत.
- प्रत्येक वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार.
- गॅस वर शासनाची सबसिडी मिळणार.
- एका महिन्यात एक मोफत गॅस सिलेंडर घेता येणार.
Required Documents for Mukhymantri Annapurna Yojana 2024
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- रेशनकार्ड
- कास्ट सर्टिफिकेट
- पासपोर्ट फोटो
Mukhymantri Annapurna Yojana Apply Online
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही दोन प्रकारची आहे, या दोन्ही माध्यमातून अर्जदार व्यक्तीला स्वतःहुन काहीच करण्याची गरज नाही.
ज्या महिला Mukhymantri Annapurna Yojana साठी पात्र असतील त्यांच्या लाभार्थी याद्या प्रसिद्ध होणार आहेत, यादी मध्ये ज्यांचे नाव असेल त्यांना त्यांच्या मर्जी नुसार वर्षातून कधी पण 3 फ्री गॅस सिलेंडर घेता येणार आहेत.
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिला
ज्या महिला उज्ज्वला योजना साठी लाभार्थी असतील त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र अंतर्गत मोफत गॅस सिलेंडर चा डायरेक्ट लाभ भेटणार आहे.
तुम्ही ज्या कंपनी चा गॅस वापरता त्यांच्या कडून लाभार्थी महिलांची यादी जाहीर होणार आहे. जर तुम्ही उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिला असाल, तर तुमचे नाव यादीत समाविष्ट असेल, त्यामुळे तुम्हाला इतर कोणतेच अनावश्यक फॉर्म भरण्याची गरज नाही.
माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना साठी ज्या महिला पात्र झाल्या आहेत, त्यांना Mukhymantri Annapurna Yojana चा लाभ मिळणार आहे.
वर सांगितल्या प्रमाणे तुम्ही ज्या कंपनी चा गॅस सिलेंडर घेता, त्या कंपनी मार्फत Mukhymantri Annapurna Yojana List जारी केली जाणार आहे. लिस्ट मध्ये ज्या महिलांचे नाव असेल त्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.
डायरेक्ट लिंक
अधिकृत वेबसाईट | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वेबसाईट |
नवीन योजना अपडेट साठी | MahaHelpline.Com |
सरकारी योजना WhatsApp Group | लगेच जॉईन करा |
नमस्कार माझ नाव श्रीकांत शिंदे, मागच्या 2 वर्षा पासून मी ब्लॉगिंग करतोय. महा हेल्पलाईन पोर्टल बनवण्याच्या मागे माझ एकच उद्देश आहे, तो म्हणजे महाराष्ट्र योजना, केंद्र योजना आणि अशाच विविध शासनाच्या स्कीम्स लोकांपर्यंत पोहोचवणे.