नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे Mukhyamantri Yojana doot Bharti 2024 Online Apply अर्ज सुरु झाले आहेत, सरकारी नोकरी करण्याची संधी शासन सर्व तरुणांना या उपक्रमांतर्गत देत आहे.
जर तुम्हाला नोकरीची गरज असेल तर लगेच Mukhyamantri Yojana doot Online Apply करून टाका, एका गावातून एक योजनादूत नियुक्त केला जाणार आहे.
थेट शासनाची नोकरी करण्याची संधी आहे, काम पण खूप अवघड नाहीये, तुम्हाला फक्त सरकारच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या योजनांची माहिती तुमच्या गावातील लोकांना द्यायची आहे.
Mukhyamantri Yojana doot Bharti 2024
महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि शासन आपल्या दारी उप्रकम अंतर्गत, मुख्यमंत्री योजनादूत भरती सुरु करण्यात आली आहे.
सरकार द्वारे राज्यात एकूण 50,000 हजार योजनादूत यांची नियुक्ती केली जाणार आहे. प्रत्येक गावातील 1 व्यक्तीला योजनादूत म्हणून निवडले जाणार आहे, सोबत निवडलेल्या योजनादूतांना 10,000 हजार रुपये महिना मानधन दिले जाणार आहे.
उपक्रमाचे नाव | Mukhyamantri Yojana doot Bharti 2024 |
रिक्त जागा | 50,000 |
वेतन/ पगार | 10,000 हजार रुपये महिना |
नोकरीचा कार्यकाळ | 6 महिने |

मुख्यमंत्री योजनादूत भरती साठी येथून ऑनलाईन अर्ज करा
योजनादूतांना काय काम करावे लागते?
शासनाद्वारे एकदा योजनादूत म्हणून नियुक्ती झाली कि तुम्हाला तुमच्या गावातील सर्व नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती द्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला घरोघरी जाऊन स्वतः माहिती सांगायची आहे.
जास्तीत जास्त नागरिक शासनाच्या योजनांचा लाभ कसा घेऊ शकतील, यावर Focus ठेवायचा आहे. ग्रामपंचायत मिटिंग मध्ये तसेच गावच्या सामुहिक कार्यक्रमात योजनादूत यांना उपस्थित राहून सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे.
योजानादूतांना काय लाभ मिळेल?
योजनादूत म्हणून नियुक्त झालेल्या तरुणाला सरकारी नोकरी करण्याची संधी मिळेल, सोबत तरुण जर बेरोजगार असेल तर त्याला कामाचा अनुभव होईल.
- 6 महिने योजनादूत म्हणून काम करता येणार.
- महिन्याला 10 हजार रुपये मानधन, याप्रमाणे 60 हजार रुपये मिळणार.
- 6 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र मिळेल.
- या प्रमाणपत्राचा फायदा तुम्हाला पुढे नोकरी मिळवण्यासाठी होईल.
मुख्यमंत्री योजनादूत भरती वयोमर्यादा (Age Limit)
Mukhyamantri Yojana Doot Online Apply साठी अर्जदार तरुणाचे वय हे 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असावे.
योजनादूत भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- डोमासाईल सर्टिफिकेट (तहसील मधून काढलेले रहिवासी)
- डिग्री चे प्रमाणपत्र (B.A, B.Com, B.Sc)
- MS-CIT पास प्रमाणपत्र
योजनादूत साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
Mukhyamantri Yojana Doot Online Apply:

मुख्यमंत्री योजनादूत भरती साठी येथून ऑनलाईन अर्ज करा
योजनादूत भरती साठी ऑनलाईन अर्ज हा mahayojanadoot.org या वेबसाईट वरून करायचा आहे.


योजनादूत पोर्टलवर ‘उमेदवार नोंदणी’ वर क्लिक करा
आधार क्रमांक प्रविष्ट करा, OTP द्वारे पडताळणी करा.
सत्यपनानंतर तुमचा आधारभूत तपशील टाका, ईमेल आणि मोबाईल नंबर बरोबर असल्याची खात्री करा.
पासवर्ड बनवून योजनादूत पोर्टलवर पुन्हा लॉगीन करा.
शैक्षणिक पात्रता टाकून प्रोफाईल बनवा, आणी आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
पुढे फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे, ती भरून टाका.
6 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट आणि त्याच्या अटी पाहून त्याला स्वीकृती द्या.
तुमचे बँक खाते Details माहिती यावेळी सादर करा.
योजनादूत भरती चा फॉर्म एकदा तपसा आणि नंतर अर्ज सबमिट करून टाका.