Majhi Ladki Bahin Yojana Online Apply 2024: माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 15 Average: 3.8]

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply: नमस्कार मित्रांनो लाडकी बहिण योजने संबंधित एक मोठी अपडेट आली आहे, लाडकी बहिण योजनेचे अधिकृत पोर्टल लाँच करण्यात आले आहे. आता महिलांना अगदी सुरळीतपणे वेबसाईट वरून Ladki Bahin Yojana साठी Online Apply करता येणार आहे.

आर्टिकल मध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजना पोर्टलवरून ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा? याची माहिती स्टेप बाय स्टेप देणार आहे. सोबत Ladki Bahin Yojana Portal Link देखील मी आर्टिकल मध्ये Mention केली आहे.

त्यामुळे जर तुम्ही अद्याप Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply केलं नसेल तर आता नव्याने सुरू करण्यात आलेल्या योजनेच्या पोर्टल वरून फॉर्म भरून घ्या.

Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेच्या माध्यमातून महाराष्टातील गरीब महिलांना महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत.

जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा घ्यायचा असेल, तर लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. या आगोदर Nari shakti doot App वरून फॉर्म भरले जात होते, पण आता Ladki Bahin Yojana Official Website आली आहे.

शासनाने लाडकी बहीण योजनेच्या पोर्टल वरून फॉर्म भरणे देखील आता खूप सोपे केले आहे, त्यामुळे लवकर आणि जलद फॉर्म भरले जात आहेत. सोबत ॲप प्रमाणे इतर कोणत्याही अडचणी किंवा Error पण येत नाहीयेत.

माझच एक उदाहरण देतो, काल जेव्हा Ladki bahin yojana portal आले होते, तेव्हा मी स्वतः एक ladki bahin yojana form वेबसाईट वरून भरला. आनंदाची गोष्ट म्हणजे जसा फॉर्म भरला तसा लगेच Approved देखील झाला. खोटं बोलत नाहीये, Website वरून भरलेले जे अर्ज आहेत त्याला सरकार आता जास्त प्राधान्य देत आहे. 

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 (Step by step guide)

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply 2024

माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, लाडकी बहिण योजनेसाठी इतर देखील अर्ज करण्याचे पर्याय आहेत. पण सर्वात सुरक्षित, जलद आणि सोपा पर्याय आता आलेला आहे, त्यामुळे येथे आपण लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती घेणार आहोत.

अधिकृत वेबसाईट@ladakibahin.maharashtra.gov.in
ऑनलाईन अर्ज Apply Online Link
महा हेल्पलाईन पोर्टलClick Here
Helpline Number181
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply Link

स्टेप 1: लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट पोर्टलला भेट द्या. 

स्टेप 2: होम पेजवरील अर्जदार लॉगिन पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 3: त्यानंतर खाते तयार करा या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 4: आवश्यक अशी सर्व माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. 

स्टेप 5: पुढे मोबाईल नंबर आणि Password वापरून लॉगिन करा.

स्टेप 6: लॉगिन केल्यावर एक डॅशबोर्ड येईल, त्यात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 7: त्यानंतर अर्जदार महिलेचा आधार नंबर टाका, OTP आल्यावर तो टाकून Verify करा.

स्टेप 8: लाडकी बहीण योजना ऑनलाईन फॉर्म तुमच्यासमोर प्रदर्शित होइल, अर्जामध्ये विचारलेली माहिती भरून घ्या.

स्टेप 9: शेवटी लाडकी बहीण योजना साठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून टाका.

स्टेप 10: त्यानंतर Submit बटणावर क्लिक करून Majhi Ladki Bahin Yojana Online Apply प्रोसेस Complete करा.

अर्ज सबमिट झाला की तुमच्या समोर फॉर्मची पावती येईल, त्याच पावती च्या वरती ladki bahin yojana form status तुम्हाला चेक करता येईल.

तर मित्रांनो अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने 1 मिनिटाच्या आत Majhi Ladki Bahin Yojana Online Apply करता येते. प्रोसेस खूप सोपी आहे, आणि आता Approval पण फास्ट होत आहेत, त्यामुळे टेन्शन घ्यायचे काहीच कारण नाही.

मला आशा आहे तुम्हाला Majhi Ladki Bahin Yojana Online Apply ची माहिती आवडली असेल, लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा? हे जर तुम्हाला या आर्टिकल द्वारे कळले असेल तर इतरांना ही पोस्ट नक्की शेअर करा, म्हणजे त्यांचे पण अर्ज लवकर Approved होतील.

Click to rate this post!
[Total: 15 Average: 3.8]

14 thoughts on “Majhi Ladki Bahin Yojana Online Apply 2024: माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज”

  1. Shubhangi Ranjeet Bhosale

    अर्जदार लॉगिन मध्ये कोणाची माहिती भरायची

  2. सोहन जाधव

    भाऊ सर्व्हर (Site ) मेंटेनन्स आहे होईल ना नक्की क्लियर

          1. Dada majhya AAI cha form provisionally rejected zala karun message ala pn app mdhi reject zala manun nahi dakhvat ahe

  3. Application no. चा फॉरमॅट काय आहे म्हणजे मी जिल्हा बीड ता परळीचा आहे तर मी केलेल्या अर्जाचा क्र. BEPA असा आहे. दुसऱ्या जिल्ह्यासाठी वेगळा आहे का? कारण माझ्या प्रोफाईल वरुन मी दुसऱ्या जिल्ह्यातील व्यक्ती चा अर्ज केला आहे त्याचा पण अर्ज क्र. BEPA ने सुरू होतो. त्याचा रिजेक्ट तर होणार नाही ना?

  4. मराठी बहिणीचा फॉर्म भरला होता पण मला झाला माझ्या प्रॉब्लेम केलेल्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top