Maharashtra Exit Poll 2024: लाडकी बहिण योजना पुढे चालू राहणार! की बंद होणार? याचा निर्णय या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत होणार आहे.
जर राज्यात महायुती ची सत्ता आली तरच Ladki Bahin Yojana सुरू राहणार आहे, आणि जर दुर्दैवाने सत्ता आली नाही तर मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार आहे.
राज्यात आता विधानसभा निवडणुका पार पडल्या, आता सर्व राज्याचं लक्ष लागलंय ते फक्त एका गोष्टी कडे ते म्हणजे निवडणुकीचा निकाल. सर्वांना जाणून घ्यायचं आहे राज्यात कोण येणार, चला तर आजच्या या खास आर्टिकल मध्ये आपण Maharashtra Exit Poll 2024 ची माहिती जाणून घेऊया.
Maharashtra Exit Poll 2024
विभाग | महायुती | महा विकास आघाडी | इतर (अपक्ष) | एकूण जागा |
---|---|---|---|---|
विदर्भ | 32-37 | 24-29 | 2 | 62 |
मराठवाडा | 16-21 | 24-29 | 2 | 46 |
प. महाराष्ट्र | 28-33 | 37-42 | 1 | 70 |
खानदेश | 15-20 | 15-20 | 1 | 35 |
ठाणे-कोकण | 23-28 | 09-14 | 3 | 39 |
मुंबई | 15-20 | 15-20 | 1 | 36 |
एकूण जागा | बहुमत | महायुती | महा विकास आघाडी |
---|---|---|---|
288 | 145 | 129-159 | 124-154 |
तर मित्रांनो अशा प्रकारे Maharashtra Exit Poll 2024 सांगण्यात आला आहे, हा Exit Poll Zee 24 तास न्यूज चॅनल द्वारे सादर करण्यात आला आहे.
सोबत विशेष बाब म्हणजे हा Exit Poll साधा सुधा नाही, तर Ai च्या मदतीने बनवलेला राज्यातील पहिला Maharashtra Exit Poll 2024 आहे.
अजून एक बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील, या Ai ने Exit Poll जाहीर केला होता, तेव्हा पण अगदी 95% बरोबर अंदाज आला होता. त्यामुळे आता या विधानसभा निवडणुकीचा अंदाज कितपत खरा ठरतो हे पाहावं लागेल.
लाडकी बहिण योजना चालू राहणार? की बंद होणार?
या Maharashtra Ai Exit Poll 2024 नुसार राज्यात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाहीये, 145 जगांच बहुमत असत त्यामुळे या Exit Poll नुसार महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीना बहुमताचा आकडा घाठता येणार नाहीये असं सांगण्यात आल आहे.
पण तरीही या विधानसभा निवडणुकीत महायुती च पारड जड असल्याचं बोललं जात आहे, जर महायुतीला ठाणे आणि विधर्भात जास्त जागा मिळाल्या तर हे दोन मतदार संघ निर्णायक ठरू शकतात.
त्यामुळे जर BJP सत्तेत आली तर, Mazi Ladki Bahin Yojana पुढे अजून सुरू राहणार आहे. आणि निवडणुकी पूर्वी हप्ता वाढवण्याच जे वचन दिलं होत ते पण पूर्ण करून महिलांना 1500 ऐवजी 2100 मिळणार आहेत.