Magel Tyala Solar Pump Yojana 2024 Online Registration मागेल त्याला सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Magel Tyala Solar Pump Yojana: महाराष्ट्र शासनाद्वारे आता ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ दिला जात आहे. यासंबंधी अधिकृत अशी घोषणा करण्यात आली आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना साठी अर्ज देखील आता सुरू झाले आहेत, mahadiscom मार्फत अर्ज करायचा आहे.

नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, त्यामुळे आता सर्व इच्छुक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी सौर कृषी पंप भेटणार आहे.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana असे या स्कीमचे नाव आहे. योजनेच्या नावामध्येच योजनेचा उद्देश सांगण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचा उद्देश या योजनेचा आहे. कृषी पंप पाहिजे असेल, तर तुम्हाला फक्त ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, दुसरं काहीच करण्याची गरज नाही.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र साठी जर तुम्हाला Online Apply करायचं असेल तर हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या स्टेप फॉलो करून अर्ज भरा.

Magel Tyala Solar Pump Yojana 2024

Magel Tyala Solar Pump Yojana
योजनाचे नावमागेल त्याला सौर कृषी पंप योजना
सुरुवातमहाराष्ट्र शासन
उद्देशशेतकऱ्यांना सोलर पंप देणे
लाभार्थीमहाराष्ट्रातील सर्व शेतकरी
लाभसौर कृषी पंप घेण्यासाठी 95% पर्यंत अनुदान
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
हेल्पलाईन नंबर1800 233 3435

Magel Tyala Solar Pump Yojana 2024 Elegibility

शेळी – मेंढी असल्यास, महिन्याला 6,000 रु.

मागेल त्याला सोलार पंप योजनेसाठी शासनाद्वारे काही निकष लावण्यात आले आहेत, जर तुम्ही यांनी कशात येत असाल तर तुम्हाला Magel Tyala Solar Pump Yojana साठी Online Apply करता येणार आहे.

  • अर्जदार व्यक्तीकडे किमान 2.5 एकर शेतजमीन असावी.
  • शेतजमिनीजवळ पाण्याचा स्त्रोत असावा. (शेततळे, विहीर, बोअरवेल, नदी, नाले)
  • शाश्वत पाण्याचा स्त्रोत असेल तरच, महावितरण द्वारे सोलार पंप देण्यात येणार आहे.

Magel Tyala Solar Pump Yojana Benefits

  • साधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदान.
  • अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांना 95% अनुदान.
  • महावितरण द्वारे 5 वर्षांची दुरुस्ती हमी आणि इन्शुरन्स.
  • विज बिल आणि लोडशेडिंगचे चिंता नाही.
  • सिंचन करण्यासाठी दिवसा वीजपुरवठा.

सौर कृषी पंप साठी किती पैसे भरावे लागणार?

सर्वसाधारण शेतकरी10 टक्के रक्कम भरावी लागणार
अनुसूचित जाती जमाती मधील शेतकरी5 टक्के रक्कम भरावी लागणार

बाकी उर्वरित रक्कम ही शेतकऱ्यांच्या नावे केंद्र आणि राज्य सरकार भरणार आहे.

कोणता सौर कृषी पंप भेटणार?

शेतकऱ्यांकडे असलेल्या शेत जमिनीच्या अनुसार सरकार सोलार पंप देणार आहे.

2.5 एकर जमीन3 HP चा सौर कृषी पंप
2.5 ते 5 एकर जमीन5 HP चा सौर कृषी पंप
5 एकर पेक्षा जास्त जमीन7.5 HP चा सौर कृषी पंप भेटणार

Magel Tyala Solar Pump Yojana Documents List

मागील त्याला सौर कृषी पंप योजना साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

  • जमिनीचा सातबारा उतारा
  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • कास्ट सर्टिफिकेट
  • बँकेचे पासबुक
  • पासपोर्ट फोटो
  • जमीन सामायिक असल्यास ना हरकत प्रतिज्ञापत्र

जर शेतकऱ्याची जमीन ही सामायिक असेल, आणि जमिनीचे मालक हे एका पेक्षा जास्त असतील तर, त्यांना ना हरकत प्रमाणपत्र सोबतच 200 रुपयांचा स्टॅम्प पेपर देखील सबमिट करावा लागणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना, येथून अर्ज करा

Magel Tyala Solar Pump Yojana Online Registration

Magel Tyala Solar Pump Yojana Online Registration

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना साठी ऑनलाइन स्वरूपात महावितरणच्या वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया ही खूप सोपी आहे, तुम्हाला फक्त तुमची पर्सनल डिटेल्स शेतीची माहिती आणि बँकेची माहिती टाकायची आहे. प्रक्रिया सिम्पल आहे, तुम्ही स्वतः पण तुमच्या मोबाईल वरून देखील मागील त्याला सोलार पंप योजनेसाठी अर्ज करू शकता.

ऑनलाईन अर्जApply Online
अर्ज करण्याची शेवटची तारीखअद्याप Last Date सांगण्यात आलेली नाही.

Magel Tyala Solar Pump Yojana Online Registration साठी खालील स्टेप फॉलो करा:

  • सुरुवातीला तुम्हाला महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • तिथे तुम्हाला MTSKPY लिंक वर जाऊन पेज ओपन करायचे आहे.
  • पोर्टल वर गेल्यानंतर पोर्टल वरील सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
  • माहिती वाचून झाल्यावर, होम पेज वरील लाभार्थी सुविधा मधून ‘अर्ज करा’ या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • तुमच्यासमोर ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना फॉर्म’ उघडेल.
  • फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती एकदा पाहून घ्या.
  • त्यानंतर काळजीपूर्वक अत्यंत सावकाश रीतीने फॉर्म भरा.
  • जी माहिती विचारली आहे तीच माहिती द्या अन्य अनावश्यक माहिती फॉर्ममध्ये भरू नका.
  • Online Application Form for Maagel Tyala Saur Krushi Pump Yojana भरून झाल्यावर तुम्हाला शेवटी आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आवश्यक कागदपत्रे वर सांगितले आहेत, अपलोड बटनावर क्लिक करून Documents Upload करा.
  • त्यानंतर फॉर्म खाली दिलेल्या Submit या बटणावर क्लिक करून Magel Tyala Solar Pump Yojana Online Registration पूर्ण करा.

एकदा का तुमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण झाले, की तुमचा फॉर्म शासनाद्वारे तपासला जाईल. जर तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी पात्र असाल, तर तुमचा अर्ज मंजूर करण्यात येईल.

एकदा का अर्ज मंजूर झाला, की मग तुम्हाला महावितरण च्या अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म चे स्टेटस तपासायचे आहे. जर Status Approved असेल, तर लाभार्थी सुविधा मधूनच ‘देयकाची रक्कम भरणा करा’ वर क्लिक करून सोलर पंप चे पैसे भरा, पैसे भरले की तुम्हाला काही दिवसात Solar Pump मिळून जाईल.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment