केंद्र सरकार द्वारे महिलांना आता प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. यासाठी Lakhpati Didi Yojana Maharashtra सुरू करण्यात आली आहे.
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात अधिकृत घोषणा केली आहे, देशातील महिला अधिक सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावी यासाठी ही योजना सुरू केल्याचे सरकारने सांगितले आहे.
लखपती दीदी योजना मध्ये देशातील सर्व पात्र महिलांना पाच लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे.
महिलांना लखपती करण्यासाठी केंद्र सरकार द्वारे या अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे.
जर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर ही योजना नेमकी काय आहे? कशासाठी पैसे मिळणार आहेत? कोणत्या महिला पात्र आहेत? अर्ज कसा करायचा? याची संपूर्ण माहिती या पोस्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे.
Lakhpati Didi Yojana Maharashtra In Marathi
योजनेचे नाव | Lakhpati Didi Yojana |
घोषणा | पंतप्रधान नरेंद्र मोदी |
अंमलबजावणी | महाराष्ट्रासह, संपूर्ण भारतात |
उद्देश | महिलांना लखपती बनवणे |
लाभ | 5,00,000 रुपये बिनव्याजी कर्ज |
लाभार्थी | बचत गटातील महिला |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन /ऑफलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | lakhpatididi.gov.in |
लखपती दीदी योजना लाभ
1,00,000 ते 5,00,000 रुपये (Loan) | 20 ते 30 हजार रुपये (RF) |
1,50,000 रुपये (VRF) | 2,50,000 रुपये (CIF) |
2,00,000 रुपये (PG) | 15,00,000 रुपये (FPO) |
6,50,000 ते 8,50,000 रुपये (AGEY) | 2,50,000 ते 5,00,000 रुपये (OSF) |
याव्यतिरिक्त अजून बरेचसे लाभ लखपती दीदी योजना अंतर्गत महिलांना दिले जात आहेत. हे सर्व लाभ कर्ज स्वरूपात असणार आहेत, म्हणजे महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज स्वरूपात ही आर्थिक सहायता केली जाणार आहे.
वर जे लाभ आणि लाभाची रक्कम दिली आहे, त्या रकमे संबंधी जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही lakhpati didi yojana official website वर जाऊन माहिती जाणून घेऊ शकता.
लखपती दीदी योजना पात्रता निकष
- अर्जदार व्यक्ती महिला असावी.
- महिला महाराष्ट्र राज्याची (संबंधित) रहिवासी असावी
- महिलेची वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा कमी असावे.
- महिलेचे वय – 18 ते 50 वर्षे दरम्यान असावे.
- अर्जदार महिला ही बचत गटामध्ये असावी.
लखपती दीदी योजना आवश्यक कागदपत्रे
लखपती दीदी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- महिलेचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट फोटो
- मोबाईल नंबर
लखपती दीदी योजना अर्ज प्रक्रिया
लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेला महिला बचत गटामध्ये सामील होणे अनिवार्य आहे.
Official Website | लखपती दीदी पोर्टल |
> सर्वात पहिल्यांदा तुम्हाला लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला बचत गटा मार्फत एक व्यवसाय सुरू करावा लागेल.
> सेल्फ हेल्प ग्रुप व्यवसाय योजना तयार केल्यानंतर एका उद्योगाचे नियोजन करून त्याचा आराखडा सरकारला पाठवायचा आहे.
> उद्योगाच्या आराखड्याची पडताळणी शासनामार्फत केली जाईल.
> जर सर्व अटी आणि शर्तीचे पालन होत असेल, तर अर्जदार महिलांना लखपती दीदी योजना चा लाभ मिळेल.
Lakhpati Didi Yojana अंतर्गत महिलांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी सरकार तर्फे 5 लाख रुपयांचे Business Loan दिले जाईल.
Loan सोबत वर सांगितल्या प्रमाणे इतर पण लाभ या योजने द्वारे महिलांना दिले जाणार आहेत. एक प्रकारे Stable Income चा Source तयार करून महिलांना लखपती बनवायचा सरकारचा प्लॅन आहे.
या आर्थिक वर्षात देशातील तब्बल 3 करोड महिलांना या Lakhpati Didi Yojana चा लाभ दिला जाणार आहे. या मध्ये महाराष्ट्रात 17.42 लाख महिलांना लाभ भेटणार आहे. सर्वात जास्त लाभ हा बिहार, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेशातील महिलांना मिळणार आहे.
फक्त संपूर्ण बातमी वाचण्यासाठी आकर्षक टायटल देऊ नका. पूर्ण बातमी वाचली असता बरेचसे खोटे दावे बातमीत आहेत लखपती दीदी योजनेत प्रत्येक महिलांना पाच लाख रुपये दिले जाणार असे टायटल मध्ये लिहिले आहे तीच सर्व अभ्यास करता पाच लाख रुपये दिले जाणार नसून ते कर्ज आहे आणि तेही बचत गटासाठी आहे याचा उल्लेख टायटल मध्ये नाही त्यामुळे फक्त बातमी वाचली जाईल म्हणून आकर्षक असे टायटल देऊन नाही ते उद्योग करू नका
खोटा दावा कोणताही केला गेला नाहीये, बातमी मध्ये स्पष्टपणे 5 लाखाची मदत अस लिहील आहे. कर्जाचा सुद्धा उल्लेख आहे, दुसऱ्या साईट वरील बातमी वाचून त्याचा दोष आम्हाला देऊ नका. संपूर्ण बातम्या खऱ्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतो.