Ladki Bahin Yojana DBT Status Check: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी शासनाने DBT Seeding करण्याचे आवाहन केले आहे. जर तुमच्या बँक खात्याला DBT Seeding असेल तरच 3000 रू. मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला Ladki Bahin Yojana DBT Status Check करून घेणं आवश्यक आहे.
DBT Seeding मध्ये जर बँकेचे नाव दाखवत असेल, आणि ती बँक Active असेल तर तुम्हाला आजच्या तारखेत लाडकी बहीण योजनेचे 3000 मिळणार आहेत.
Ladki Bahin Yojana DBT Status Check
लाडकी बहिण योजनेचे पैसे लाभार्थी महिलेच्या बँक खात्यावर डायरेक्ट पाठवले जाणार आहेत, यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे तुमच्या बँकेमध्ये DBT On असणे गरजेचे आहे.
अपात्र महिलांना सुद्धा 3000 मिळणार
14 तारखेपासून लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा होणे सुरू झाले आहे, आज 17 तारखेला उर्वरित सर्व महिलांचे पैसे जमा होणार आहेत.
त्यामुळे जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म Approved झाला असेल, तर तर तुम्हाला तुमच्या DBT Seeded बँक खात्यावर पैसे मिळणार आहेत.
जर तुम्ही अजून पण तुमचे Ladki Bahin Yojana DBT Status Check केले नसेल, तर खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून DBT Status पाहून घ्या. लक्षात घ्या हे सर्वात महत्वाचे आहे, जरी तुमचा फॉर्म Approved झाला आणि DBT Seeding नसेल तर तुम्हाला 3000 मिळणार नाहीत.
त्यामुळे आर्टिकल मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि त्यानुसार तुमचे Ladki Bahin Yojana DBT Status पाहून घ्या. एकदा का स्टेटस Active दिसले की तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. आज तुमच्या बँक खात्यावर 3000 रुपये आणि प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा झालेच म्हणून समजा.
लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी, नाव चेक करा
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana DBT Status Check
लाडकी बहिण योजनेचे DBT Status Check करणे खूप सोपे आहे, तुम्ही अगदी दोन मिनिटाच्या आत तुमचे Ladki Bahin Yojana DBT Status Check करू शकता.
तुम्ही तुमच्या DBT Status तुमच्या मोबाईल वरून लॅपटॉप वरून कम्प्युटर वरून किंवा टॅबलेट वरून देखील पाहू शकता.
स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे, खाली सांगितलेली प्रोसेस फॉलो करा आणि DBT Seeding Status पाहून घ्या.
स्टेप 1 – Ladki Bahin Yojana DBT Seeding Status पाहण्यासाठी तुम्हाला https://uidai.gov.in या आधार च्या अधिकृत वेबसाईट वर यायचे आहे.
स्टेप 2 – वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला Bank Seeding Status या Option वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 3 – क्लिक केल्यानंतर एक नवीन वेब पेज उघडेल, तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे.
स्टेप 4 – Aadhar Number टाकल्यानंतर CAPTCHA Code भरायचा आहे.
स्टेप 5 – त्यानंतर Send OTP या Option वर क्लिक करून OTP Register मोबाईल नंबर वर पाठवायचा आहे.
स्टेप 6 – आधार ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला टाकून Verification पूर्ण करायचे आहे.
स्टेप 7 – एकदा तुमचा OTP Verify झाला की नंतर तुमचे DBT Status Open होईल.
स्टेप 8 – Ladki Bahin Yojana DBT Status मध्ये तुम्ही तुमच्या आधार ला लिंक असलेल्या बँकेची नावे पाहू शकता.
स्टेप 9 – DBT Seeding मध्ये Active असं जर दिसत असेल तर टेन्शन घेऊ नका, दर महिन्याला तुमच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रू. जमा होतील.
स्टेप 10 – आणि जर तुमचे DBT Status Active नसेल, तर लगेच बँकेत जाऊन ते Active करून घ्या.
एक लक्षात घ्या, ज्यांचे DBT Status Active आहे, केवळ अशाच लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. जर तुम्ही योजनेसाठी पात्र जरी असला, आणि तुमच्या बँकेला DBT Seeding नसली तर तुम्हाला पैसे पडणार नाहीत. त्यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर बँकेत जाऊन DBT Seeding Active करा.
Narishakti app madhe kelele arj disat nahit
ahamla form edit karyaycha ahe pan option yet nahi kay karave
ladki bahin helpline 181 la contact kra