Ladki Bahin Yojana App: फॉर्म बंद झाले! नवीन अपडेट, आता कोणालाही अर्ज करता येणार नाही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 10 Average: 3.8]

Ladki Bahin Yojana App: नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना संबंधी एक नवीन अपडेट आली आहे, आता योजनेचे फॉर्म बंद झाले आहेत. यासंबधी अधिकृत अशी कोणती घोषणा केली नाहीये, पण फॉर्म भरताना No New Form Accepted! असा मॅसेज Display होत आहे.

त्या संबंधी तुम्हाला सविस्तर अशी माहिती मी या आर्टिकल मध्ये दिली आहे, नक्की काय झालंय! आणि आता नवीन अर्ज कसे भरायचे? हे जर तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर आर्टिकल काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा.

Ladki Bahin Yojana App

सुरुवातीला जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती, तेव्हा nari shakti doot app वर फॉर्म भरले जात होते. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी नारी शक्ती दूत ॲप वरून फॉर्म भरले आहेत, पण आता शासनाने 1 ऑगस्ट रोजी ladkibahin.maharashtra.gov.in ही योजनेसाठी Official Website सुरू केली आहे.

पोर्टल सुरू केल्या मुळे नारी शक्ती दूत ॲप आता बंद करण्यात आला आहे, नारी शक्ती दूत ॲप वरून आता नवीन कोणतेही फॉर्म स्वीकारले जात नाहीयेत.

👉लाडकी बहिण योजनेसाठी येथून अर्ज करा

पण आगोदर जे फॉर्म भरले आहेत, ते फॉर्म ॲप वरच असणार आहेत, त्यांना काही होणार नाही. सोबत जर तुमचे अर्ज Reject जरी झाले तरी तुम्हाला Edit चा Option दिला गेला आहे, फक्त आगोदर भरलेले फॉर्म तुम्ही edit करू शकणार आहात.

नारी शक्ती दूत ॲप बंद, कारण काय?

नारी शक्ती दूत ॲप चे Replacement आता Ladki bahin yojana Portal ने केली आहे. पोर्टल वर आता ऑनलाईन फॉर्म पण भरणे सुरू झाले आहे, त्यामुळे नारी शक्ती दूत ॲप ची गरज राहिली नाही, म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

No new form accepted in ladki bahin yojana संबंधी कोणती घोषणा वैगेरे करण्यात आली नाहीये, किंवा कोणती अधिसूचना सरकार द्वारे देण्यात आली नाही. डायरेक्ट नारी शक्ती दूत ॲप वरून नवीन फॉर्म घेणे बंद करून टाकले आहे.

सरकारने घेतलेल्या या निर्णयामागे काही कारणे आहेत, ते म्हणजे Server वर पडणारा Overload. सरकारला तो Load कमी करायचा होता, त्यामुळे आता पोर्टल सुरू झाले आहे, म्हणून ॲप वर फॉर्म भरण्याची सुविधा बंद केली आहे.

Ladki bahin yojana last date आता जवळ आली आहे, त्यामुळे त्या आगोदर हा निर्णय घेणं थोड विचित्र वाटतंय. कारण जेव्हा पासून योजनेची साईट आली आहे, तेव्हा पासून साईट वर काही ना काही प्रोब्लेम येत आहेत. सुरुवातीला साईट चांगली चालत होती, पण आता साईट वर Aadhar OTP Invalid असाच Error येतोय.

साईट चे Maintenance करून नंतर लाडकी बहीण योजना पोर्टल सुरळीत चालू झाल्या वर नारी शक्ती दूत ॲप वरून फॉर्म बंद केले असते तर चालले असते. पण आता या निर्णयामुळे बऱ्याच महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात.

तर मित्रांनो ही होती महत्वाची अशी Ladki Bahin Yojana App संबंधी अपडेट, मला आशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल. त्यामुळे अपडेट जर Helpful वाटली असेल तर ही पोस्ट इतरांना पण शेअर करा.

Click to rate this post!
[Total: 10 Average: 3.8]

16 thoughts on “Ladki Bahin Yojana App: फॉर्म बंद झाले! नवीन अपडेट, आता कोणालाही अर्ज करता येणार नाही”

  1. नवीन फॉर्म केव्हा भरणे सुरू होईल. उत्पन्न काढावे लागले.त्यामुळे उशीर झाला.

    Reply
  2. Mazi mulagi pan form barte pan tine maza form barayla ghetala aani sagli detail pan takali pan no new form accepted aaa yet aahe ??

    Reply

Leave a Comment