E Ration Card Download: मित्रांनो जर तुमचा रेशन कार्ड हरवल असेल, तर आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून देखील रेशन कार्ड मिळवता येणार आहे.
शासनातर्फे यासंदर्भात नवीन सुविधा देण्यात आली आहे, ज्या नागरिकांचे रेशन कार्ड हरवले आहे किंवा गहाळ झाले आहे त्यांना मोबाईल वरून E Ration Card Download करता येणार आहेत.
पण यासाठी काही अटी आणि शर्ती लावण्यात आल्या आहेत, अटीनुसारच पात्र रेशन कार्डधारकांना त्यांचे Ration Card Download करता येणार आहेत.
यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? प्रक्रिया काय आहे? याची संपूर्ण माहिती आता आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेऊया.
ई रेशन कार्ड साठी कोण पात्र आहे?
E Ration Card हे केवळ पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिका धारकांना दिले जात आहे. E Ration Card Download ची सुविधा आता नव्याने दिली असल्यामुळे, सध्या तरी केवळ पांढऱ्या रंगाच्या रेशन कार्डधारकांना त्यांचे रेशन कार्ड ऑनलाइन डाउनलोड करता येणार आहे.

रेशन वरील मोफत तांदूळ बंद! क्लिक करून बघा
रेशन कार्ड हरवले तर करा ऑनलाईन अर्ज
रेशन कार्ड हरवले असेल किंवा नवीन काढायची असेल तरीदेखील तुम्हाला कार्यालयात जाण्याची काहीच गरज नाही.
आता नवीन सुविधेच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पोर्टल द्वारे अर्ज करून रेशन कार्ड मिळवू शकता.
ऑनलाईन अर्ज हा महाफुड या मोबाईल ॲप वरून करता येतो, तुम्हाला फक्त गुगल प्ले स्टोर वरून हा ॲप डाऊनलोड करायचा आहे. नंतर E Ration Card Download साठी अर्ज सादर करायचा आहे.

घरबसल्या रेशनकार्डच्या विविध सुविधा
नागरिकांना घरबसल्या मोबाइलवरून ‘महाफूड च्या आरसीएम या संकेतस्थळावरून घरबसल्या नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करता येणार आहे. यात नवीन नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे, रेशन दुकान किवा नावात, पत्त्यात बदल आदी प्रकारच्या सुविधाही घरबसल्या मिळणार आहेत.
अर्ज प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही
- शिधापत्रिकाधारकांनी ऑनलाइन पद्धतीने ई- रेशनकार्डसाठी अर्ज दाखल केल्यानंतर तो अर्ज संबंधित पुरवठा विभागास प्राप्त होतो.
- तेथील अधिकाऱ्यांकडून सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यात काही त्रुटी असतील तर त्याची मागणी केली जाते.
- त्रुटी नसतील तर काही दिवसांतच लाभार्थ्यांना ई- रेशनकार्ड दिले जाते.