नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना संबंधी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे, आता Ladki Bahin Yojana Amount Increase होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या संदर्भात माहिती दिली आहे, राज्य सरकार लाडक्या बहिणींना जे ₹1,500 रुपये देत आहे, त्यामध्ये आता वाढ केली जाणार आहे.
नक्की काय विषय आहे? कधी वाढ होणार? याची सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे ही लाडकी बहीण योजना अपडेट खूप महत्वाची आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा.
लाडकी बहिण योजना, मुदतवाढ जाहीर! नवीन फॉर्म भरता येणार
Ladki Bahin Yojana Amount Increase
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना या महत्वाकांक्षी अशा स्कीम मध्ये राज्यातील पात्र अशा महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जात आहेत.
योजना सुरू झाली आहे, पहिला हप्ता देखील जारी करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील पैसे वाटप सुरू आहे, पण या गदारोळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले वक्तव्य तुमच्याकडून कदाचित Miss झाले असेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः ही मोठी घोषणा केली आहे, त्यामुळे अपडेट Fake आहे Fraud आहे, याचा विषयच नाही.
लाडकी बहिण योजनेचे दुप्पट पैसे या बँक खात्यावर येणार
लाडक्या बहिणींनी जर साथ दिली तर 1500 रुपये महिना ऐवजी 3000 रुपये महिना दिला जाईल! असे सांगण्यात आले आहे.
सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे पण म्हणाले की…
महायुती सरकारने लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला पैसे दिले, भाऊबीजेला पण दिले जातील. हा माहेरचा आहेर आहे. ही योजना बंद होणार नाही. तुम्ही सरकारची ताकद वाढविली तर आम्ही पण हात आखडता घेणार नाही.
फक्त 1500 हजारांवर थांबणार नाही. हे दीड हजार पुढे 2000 हजार, 2500 हजार, 3000 हजार होतील. लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवत जाऊ.
याचा अर्थ असा की जर महायुती सरकार विधानसभा निवडणुका जिंकेल, तर महिलांना लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवून दिली जाईल.
रक्कम कशी वाढवली जाईल:
प्रती महिना वाढीव रक्कम | वर्षाला मिळणारी रक्कम |
---|---|
1,500 रुपये | 18,000 रुपये |
2,000 रुपये | 24,000 रुपये |
2,500 रुपये | 30,000 रुपये |
3,000 रुपये | 36,000 रुपये |