लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF, Hamipatra Ladki Bahin, अर्जदाराचे हमीपत्र नमुना पहा! Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra

ladki bahin yojana हमीपत्र pdf download
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 7 Average: 4]

Hamipatra Ladki Bahin: लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना लागणारे हमीपत्र या आर्टिकल मध्ये दिले आहे, hamipatra pdf download करण्यासाठी डायरेक्ट लिंक आहे.

मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या नवीन Mazi Ladki Bahin Yojana संबंधी एक मोठी अपडेट आली आहे. त्यानुसार आता राज्यातील सर्व महिलांना विना अट लाभ मिळणार आहे. “ladki bahin yojana हमीपत्र pdf download

लाडकी बहीण योजना साठी नेमक्या कोणत्या अटी आता असणार आहेत? कोणता बदल झाला आहे? लाभ कसा मिळणार? अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? याची पूर्ण माहिती मी आर्टिकल मध्ये दिली आहे.

तुम्ही जर महिला असाल तर तुमच्यासाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे, यात अजून एक गोड बातमी मला सांगावी वाटत आहे, ती म्हणजे Mazi Ladki Bahin Yojana चे पैसे आता पुढच्या महिन्यापासून येणार असल्याची आशंका व्यक्त करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती मी लेखात दिली आहे, त्यामुळे शब्द ना शब्द काळजीपूर्वक वाचा. ही पोस्ट आपल्या MahaHelpline पोर्टल वरील पहिली पोस्ट आहे, त्यामुळे Support करा.

Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra

महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी राज्य सरकारने घेतलेला एक मोठा निर्णय महत्वाकांक्षी कार्यक्रम म्हणजे Ladki Bahin Yojana. 

शासनाने यापूर्वी महिलांसाठी बऱ्याच योजना सुरू केल्या पण लाडकी बहीण योजना सारखी कोणतीही महत्वाकांक्षी आणि महिलांना आर्थिक दृष्ट्या सबळ करणारी योजना सुरू करण्यात आलेली नव्हती अखेर आता मध्यप्रदेशच्या लाडकी बेहण योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.

लाडकी बहिण लाभार्थी यादी, येथून पहा

योजनेसाठी अर्ज पण सुरू झाले आहेत, जर तुमच्या ओळखीत कोणी महिला किंवा मुलगी असेल, आणि ती या आर्टिकल मध्ये दिलेल्या निकषात बसत असेल तर कृपया त्यांना हे आर्टिकल शेअर करा. जेणेकरून त्यांना पण लाडकी बहीण योजनेचा फायदा घेता येईल.

Help Tabel

Link Table

अधिकृत संकेतस्थळ ladkibahin.maharashtra.gov.in
ऑनलाईन अर्जApply Online Link
अर्जदाराचे हमीपत्र PDFडाउनलोड करा

Date Table

ऑनलाईन अर्जाची सुरुवात1 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची मुदत2 महिने

Mazi Ladki Bahin Yojana Benefits

  • पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत.
  • म्हणजे प्रत्येक वर्षाला १८००० रुपयाची आर्थिक मदत केली जाणार आहे.

Mazi Ladki Bahin Yojana Eligibility Criteria

  • महिलांचे वय हे २१ ते ६५ वर्षे असावे.
  • महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असाव्यात.
  • महिलांकडे अर्जासाठी लागणारे सर्व कागदपत्रे असावेत.

Mazi Ladki Bahin Yojana Documents

  • माझी लाडकी बहीण योजना साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:
  • महिलेचे आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड, रेशन कार्ड, शाळेची TC
  • उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड
  • अर्जदाराचे हमीपत्र
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक

सूचना: रहिवासी आणि उत्पन्न प्रमाणपत्र काढणे बंधनकारक नाही, Or मध्ये दिलेले कोणतेही एक Document तुम्ही Online Apply करताना अपलोड करू शकता.

रेशनकार्ड हे पिवळे किंवा केशरी असावे, आणि रेशनकार्ड मध्ये अर्जदाराचे म्हणजे महिलेचे नाव असावे. सोबत रेशनकार्ड किमान १५ वर्षे जुने असावे.

Majhi Ladki Bahin Yojana Hamipatra PDF Download

माझी लाडकी बहीण योजनेसाठी वर आवश्यक डॉक्युमेंट मध्ये दिल्या प्रमाणे अर्जदाराचे हमीपत्र अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्ज करताना महिलेला hamipatra वर सही करावी लागते आणि नंतर ते Scan करून फॉर्म मध्ये अपलोड करावे लागते.

हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी मी एक लिंक दिली आहे, Arjdarache hamipatra PDF स्वरूपात तुम्ही वर दिलेल्या Link Table मधून मिळवू शकता. ladki bahin yojana हमीपत्र pdf download करून तुम्ही Ladki Bahin Yojana साठी Online Apply करू शकता.

Arjdarache Hamipatra Mhanje Kay?

अर्जदाराचे हमीपत्र म्हणजे काय? या संदर्भात मी तुम्हाला या सेक्शन मध्ये सांगणार आहे.

लाडकी बहीण योजना हमीपत्र हे मुळात एक Self Declaration स्वयंघोषणापत्र आहे. या मध्ये Ladki Bahin Yojana साठी शासनाने ज्या काही अटी शर्ती दिलेल्या आहेत त्या अर्जदार महिलांना मान्य आहेत असं सांगितल आहे.

हमिपत्रामध्ये खालील अटी दिलेल्या आहेत, ज्या महिलांना मान्य करायच्या आहे, त्यासाठी रिकाम्या बॉक्स मध्ये Right करायचे आहे. नंतर हमीपत्रावर खाली “अर्जदाराची सही आणि नाव” या ठिकाणी महिलेची सही घेऊन त्यांचे नाव टाकायचे आहे. सोबत बाजूला स्थळ आणि दिनांका मध्ये पण माहिती भरायची आहे.

ladki bahin yojana hamipatra अटी आणि शर्ती:

  • माझ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाख रुपया पेक्षा अधिक नाही.
  • माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी.
  • माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही.
  • मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग /उपक्रम/ मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृतीनंतर निवृतीवेतन घेत नाही.
  • मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी / स्वयंसेवी कामगार/ कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न रु. 2.50 लाख पेक्षा कमी आहे.
  • मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा रु. 1,500/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनांचा लाभ घेतलेला नाही.
  • माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार नाही.
  • माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड / कॉर्पोरेशन/ बोर्ड/ उपक्रमाचे अध्यक्ष/ उपाध्यक्ष/ संचालक/ सदस्य नाहीत.
  • माझ्यकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नाहीत.
  • माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही.

या सर्व अटी शर्ती आणि मागणी वर right करून बाकी माहिती भरून मग ladki bahin yojana हमीपत्र फॉर्म मध्ये अपलोड करायचं आहे. माहिती जर अपूर्ण भरली तर तुमचा अर्ज त्रुटी मध्ये येऊ शकतो त्यामुळे याची विशेष काळजी घ्या.

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करावा लागणार आहे. फॉर्म सुरू झाले आहेत, त्यासाठी शासनाने Nari shakti doot App सुरू केला आहे.

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply

नारी शक्ती दुत ॲप द्वारेच सध्या तरी अर्ज स्वीकारले जात आहेत, कालच महायुती मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजने संबंधी एक मोठी घोषणा केली होती, त्यानुसार आता लाडकी बहीण योजने साठी कोणतीही अट किंवा शर्ती नसणार आहेत.

त्यामुळे ज्यांनी ऑनलाईन अर्ज केला आहे, किंवा करणार आहेत त्यांना सरसकट योजनेसाठी पात्र करून महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहेत. 

योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:

  • सुरुवातीला मोबाईलवर Nari shakti doot App Download करा.
  • App Open करून अर्जदाराचा Mobile number टाकून लॉगिन करून घ्या.
  • अर्जदार महिलेची प्रोफाइल बनवा, आवश्यक ती माहिती त्यात टाकून द्या.
  • त्यानंतर ॲप च्या होम पेज वर माझी लाडकी बहीण योजना या लिंक वर क्लिक करा.
  • योजनेचा फॉर्म Open होईल, फॉर्म मधे जी माहिती विचारली आहे ती माहिती टाकून द्या.
  • शेवटी वर सांगितल्या प्रमाणे एकूण ५ कागदपत्रे आणि महिलेची एक Live Photo Capture करून अपलोड करा, त्यानंतर जतन करा या Option वर क्लिक करा.
  • यावेळी अर्जदार महिलेच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर OTP येईल, तो टाकून घ्या आणि Verification पूर्ण करा.
  • नंतर थोडस Loading घेईल, मग तुमचा Ladki Bahin Yojana Online Form Submit होऊन जाईल. नंतर केलेले अर्ज या Tab वर क्लिक करून तुम्ही फॉर्मची पावती पण मिळवू शकता.

३१ ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, पुढील महिन्यापासून योजनेचे पैसे देखील दिले जाणार आहेत. त्याची तारीख पण जाहीर झाली आहे, जर तुम्हाला याची सविस्तर माहिती पाहिजे असेल तर या आर्टिकल खाली Yes कमेंट करा, तुम्हाला मी Personaly माहिती देईल.

Yojana FAQ

लाडकी बहीण योजना साठी कोण पात्र आहे?

महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्षे वयाच्या महिला, ज्यांच्या कडे आवश्यक असे सर्व कागदपत्रे आहेत.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

Ladki bahin yojana साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, Nari shakti doot App वर फॉर्म सुरू झाले आहेत.

माझी लाडकी बहीण योजना साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

Majhi Ladki Bahin Yojana साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 आहे. 2 महिन्याचा मोठा कालावधी देण्यात आला आहे.

Click to rate this post!
[Total: 7 Average: 4]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top