Post Office RD Scheme: पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना सामान्य नागरिकांसाठी एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. या योजनेच्या माध्यमातून कमी गुंतवणुकीवर देखील नागरिक चांगले रिटर्न मिळू शकतात.
जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी Post Office RD Scheme सर्वात बेस्ट चॉईस आहे. या योजनेमध्ये आकर्षक व्याजदर तर मिळतोच सोबतच ही योजना सुरक्षित देखील आहे.
भारत सरकारच्या पोस्ट ऑफिस विभागाद्वारे ही योजना राबवली जाते, त्यामुळे Post Office RD Scheme वर सरकारचा पूर्ण कंट्रोल असतो.
Post Office RD Scheme मध्ये ₹5,000 गुंतवणूक केल्यास काय होईल?
पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीम मध्ये तुम्ही जर दर महिन्याला ₹5,000 रुपये गुंतवणूक केली तर 5 वर्षानंतर तुमची गुंतवणूक ₹3,00,000 लाखाची होईल.
आता सध्या पोस्ट ऑफिस द्वारे Post Office RD Scheme वर 6.7% व्याज दर दिला जातोय.
वर्षाला तुम्हाला 6.7% व्याजदर मिळणार आहे, म्हणजे जर तुम्ही 5 वर्षा पर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमच्या एकूण गुंतवणुकीवर 33.5% एवढा व्याजदर मिळेल.
म्हणजे 5 वर्षानंतर तुम्हाला एकूण ₹3,00,000 गुंतवणुकीवर ₹56,829 रुपये व्याज मिळेल.
त्यामुळे Post Office RD Scheme द्वारे तुम्हाला एकूण ₹3,56,829 परतावा मिळेल.
पोस्ट ऑफिस RD स्कीम साठी अटी आणि शर्ती
पोस्ट ऑफिस द्वारे आरडी स्कीम साठी काही अटी आणि शर्ती सांगितले आहेत, जर तुम्ही या योजनेच्या अटी आणि शर्ती चे पालन योग्यरीत्या केले तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.
गुंतवणुकीचा कालावधी
पोस्ट ऑफिस आरडी योजनेमध्ये तुम्हाला किमान 5 वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते, तुम्हाला जर जास्त कालावधी पर्यंत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ती पण करू शकता.
गुंतवणूक रक्कम
पोस्ट ऑफिस आरडी स्कीम मध्ये तुम्हाला दर महिन्याला किमान ₹500 ची गुंतवणूक करावी लागते, तुम्ही जास्तीत जास्त किती पण गुंतवणूक करू शकता, त्याला पोस्ट ऑफिस द्वारे कोणतीही मर्यादा नाहीये.
लोन ची सुविधा
एकदा का तुमची पोस्ट ऑफिस आरडी स्कीम 3 वर्षे जुनी झाली की तुम्ही या स्कीम वर Loan देखील उचलू शकता.
Post Office RD Scheme मध्ये गुंतवणूक कशी करावी?
Account Opening – पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्हाला RD खाते उघडावे लागेल. त्यासाठी आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे, सोबत आधारकार्ड आणि पॅन कार्ड देखील लागते.
Investment – पोस्ट ऑफिस मध्ये आरडी खाते उघडल्यानंतर त्या खात्यावर तुम्ही ठराविक रक्कम दर महिन्याला जमा करू शकता.
Maturity – योजनेचा कालावधी संपल्यानंतर तुम्हाला तुमची एकूण रक्कम व्याजासहित पोस्ट ऑफिस आरडी स्कीम मधून उचलता येते.