PM Internship Yojana 2024 Apply Online | लाडक्या भावांना सरकार देणार महिन्याला 5000 रुपये, 10वी पास अर्ज करा

PM Internship Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 2 Average: 3.5]

PM Internship Yojana 2024: केंद्र सरकारतर्फे तरुणांसाठी एक मोठी अभिनव अशी योजना सुरू केली आहे. या माध्यमाची तरुणांना महिन्याला 5000 रुपये दिले जाणार आहेत.

यासंदर्भात अधिकृत असा निर्णय केंद्र सरकार द्वारे अर्थसंकल्पामध्ये घेतला गेला आहे. स्वतः आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याची घोषणा केली आहे.

जर तुम्ही तरुण युवक अथवा युवती असाल तर तुमच्यासाठी मोठी गोल्डन अपॉर्च्युनिटी चालून आली आहे.

PM Internship Yojana 2024 अंतर्गत पात्र उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे. इंटर्नशिप स्वरूपात उमेदवारांना देशातील टॉप कंपन्यामध्ये काम करता येणार आहे.

यामुळे उमेदवारांना कामाचा अनुभव घेण्यासाठी मोठी मदत होणार आहे, आणि एकूणच पुढे नोकरीसाठी या अनुभवाचा देखील जास्त फायदा होणार आहे.

महाराष्ट्र सरकारने ज्या प्रमाणे लाडका भाऊ योजना सुरु केली आहे, अगदी त्याच प्रकारची हि योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे.

PM Internship Yojana 2024

स्वतः केंद्र सरकार द्वारे पुरस्कृत अशी ही योजना आहे, केंद्रा मार्फतच या योजनेचे फॉर्म सुरू करण्यात आले आहेत. तुम्हाला जर नोकरी पाहिजे असेल तर तुम्ही PM Internship Yojana 2024 Registration करू शकता.

योजनेचे नावPM Internship Yojana 2024
सुरुवातकेंद्र सरकार द्वारे
उद्देशबेरोजगार तरुणांना रोजगारक्षम बनवणे
लाभार्थीदेशातील सर्व पात्र तरूण
लाभ5,000 रु. महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटpminternship.mca.gov.in

योजने अंतर्गत काय काय मिळणार?

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत पात्र अशा उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे, सोबतच नोकरी दरम्यान वेतन देखील दिले जाणार आहे.

  • 12 महिने चांगल्या कंपनीमध्ये इंटर्नशिप.
  • इंटर्नशिपच्या सुरुवातीला एक रकमी 6,000 रुपये.
  • इंटर्नशिप दरम्यान महिन्याला 5,000 रुपयाचे वेतन.
  • अपघात विमा संरक्षण (कंपनी मार्फत)
  • प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (सरकार मार्फत)
  • प्रत्यक्ष काम करण्याची संधी.
  • टॉप कंपनीमध्ये काम करण्यास अनुभव.

PM Internship Yojana 2024 Eligibility

  • अर्जदार उमेदवाराचे वय हे 21 ते 24 वर्ष असावे.
  • किमान शिक्षण हे 10वी पास असावे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे.
  • उमेदवार बेरोजगार असावा.
  • उमेदवाराकडे कोणत्याही स्वरूपाची नोकरी नसावी.

PM Internship Yojana 2024 Apply Online

PM Internship Yojana साठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरावा लागेल, त्याची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे आहे.

ऑनलाईन अर्जApply Online
अधिक माहितीसाठीव्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • पीएम इंटर्नशिप च्या पोर्टल ला भेट द्या.
  • पोर्टलवर स्वतःची नोंदणी करून घ्या.
  • त्यानंतर तुम्हाला ज्या कंपनीमध्ये इंटर्नशिप करायची आहे ती कंपनी निवडा.
  • कंपनी निवडल्यानंतर Apply Now वर क्लिक करा.
  • तुमच्यासमोर PM Internship Yojana चा Form उघडेल.
  • फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
  • आवश्यक ते सर्व कागदपत्र करा.
  • त्यानंतर PM Internship Scheme चा Form तपासून घ्या.
  • शेवटी पीएम इंटर्नशिप योजनेचा अर्ज सबमिट करा.

लाडका भाऊ योजना साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

PM Internship Yojana 2024 Official Website

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना साठी केंद्र सरकार द्वारे स्पेशली एक वेब पोर्टल बनवले गेले आहे. या पोर्टलवर उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरता येणार आहे.

PM Internship Yojana Official Website चा URL हा www.pminternship.mca.gov.in हा आहे.

12 ऑक्टोबर पासून या वेबसाईटवर इच्छुक फॉर्म भरता येणार आहे. अजून ही वेबसाईट डेव्हलपमेंट मोड मध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला सध्या अर्ज करता येणार नाही.

PM Internship Yojana 2024 Last Date

पीएम इंटर्नशिप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 ऑक्टोबर 2024 आहे.

अर्जाची सुरुवात12 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख26 ऑक्टोबर 2024
पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग26 ऑक्टोबर 2024
अंतिम निवड27 ऑक्टोबर 2024
इंटर्नशिपची सुरुवात02 डिसेंबर 2024

या तारखे मध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, जर तरुणांनी या योजनेला जास्त पसंती दर्शवली तर मुदतवाढ देखील दिली जाऊ शकते.

आता सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार 12 ऑक्टोबर पासून अर्ज सुरु होणार आहेत, आणि 26 ऑक्टोबर पर्यंत सर्व अर्ज कंपनीकडे सादर केले जातील. म्हणजे 26 ऑक्टोबरच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे.

26 ऑक्टोबर ला कंपन्या तर्फे उमेदवारांची यादी शॉर्टलिस्ट केली जाणार आहे. आणि त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम निवड प्रक्रिया पार पडणार आहे, म्हणजे 27 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

एकदा का निकाल जाहीर झाला की नंतर निवडल्या गेलेल्या उमेदवारांना 02 डिसेंबर पासून इंटर्नशिप साठी बोलावले जाईल.

तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी PM Internship Yojana 2024 संबंधीची माहिती. मला आशा आहे तुम्हाला पीएम इंटर्नशिप योजनेची माहिती आवडली असेल. जर तुम्हाला या योजनेबद्दल अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली कमेंट करा, किंवा आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.

Click to rate this post!
[Total: 2 Average: 3.5]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top