रेशन कार्डची ई-केवायसी कशी करायची? जाणून घ्या | Ration Card eKyc (स्टेटस चेक ऑनलाईन) Last Date

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Ration Card eKyc: मित्रांनो केंद्र सरकारतर्फे आता रेशन कार्डची ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुम्ही तुमची Maharashtra Ration Card eKyc केली नाही तर सरकार तुमचं रेशन बंद करणार आहे.

कुटुंबात जेवढे काही सदस्य आहेत त्या सर्वांची Ration Card eKyc करावी लागणार आहे, ज्या सदस्याची Kyc करणे राहून गेले त्यांचे नाव सरकार द्वारे डायरेक्ट कमी केले जाणार आहे.

एकदा का नाव कमी झाले, की मग नंतर तुमच्या नावचे रेशन बंद होणार आहे. त्यामुळे निष्काळजीपणा करू नका, या आर्टिकल मध्ये सांगितल्या प्रमाणे तुमची Ration Card eKyc करून घ्या.

Ration Card eKyc

केंद्र सरकारने रेशन कार्ड मधून मयत व्यक्तीचे नाव कमी करण्यासाठी Ration Card eKyc करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सर्व शिधापत्रिका धारकांना त्यांच्या रेशन कार्डची ई-केवायसी करायची आहे. जे लोक kyc करणार नाहीत त्यांना रेशन मिळणार नाही.

केंद्र सरकार गरीब कल्याण योजना राबवत आहे, त्या अंतर्गत मोफत धान्य दिलं जात आहे. मोफत धान्य मयत व्यक्तीच्या नावे जाऊ नये, यासाठी आता kyc ची अट लावण्यात आली आहे.

मतदान कार्ड कसे काढावे Online? Voter ID Card Online Apply

Ration Card eKyc Maharashtra

महाराष्ट्र अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने या संदर्भात जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

Ration Card eKyc Maharashtra

शिधापत्रिका धारकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, आपल्या शिधापत्रिका मधील जे सदस्य मयत आहेत परंतु, त्याचे नाव शिधापत्रिकेमधुन वगळण्यात आलेले नाही अशा सदस्याचे नाव तात्काळ कमी करून घेण्यासाठी शिधावाटप कार्यालयात संपर्क करावा.

ज्या शिधापत्रिकेवर शिधाजिन्नस प्राप्त होत आहे, अशा सर्व शिधापत्रिका धारकांना नम्र आवाहन..

कृपया आपण आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या शिधापत्रिकेमधील जेवढ्या व्यक्ती आहेत, त्या सर्वांचे आधार कार्ड घेऊन त्यांचे सत्यापन (व्हेरीफीकेशन) करुन घेणे सक्तीचे आहे. अन्यथा ज्या व्यक्तींचे सत्यापन (व्हेरीफीकेशन) होणार नाही, त्यांचे शिधापत्रिकेमधून नाव वगळल्यास किंवा त्यांचे शिधाजिन्नस बंद झाल्यास, सर्वस्वी जबाबदारी शिधापत्रिका धारकाची राहील. कृपया याची नोंद घ्यावी.

Ration Card eKyc Status Check

रेशन कार्ड ची E-Kyc झालेली आहे की नाही, हे जर तुम्हाला तपासायचे असेल तर खाली दिलेली माहिती वाचा, आणि स्टेप बाय स्टेप गाईड फॉलो करून तुमचे Ration Card eKyc Status पाहून घ्या.

>>> मोबाईल वर प्ले स्टोर मध्ये जाऊन मेरा राशन हे ॲप डाऊनलोड करा.

>>> त्यानंतर ॲप Open करा, तुमचा रेशन कार्ड RC Number किंवा आधार नंबर टाका.

>>> त्यानंतर खालच्या सबमिट बटणावर क्लिक करा.

>>> पुढे आधार सिडींग हा ऑप्शन शोधा.

>>> तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सिडिंग Yes किंवा No असं दिसेल.

>>> ज्यांच्या नावापुढे Yes आहे त्यांना Ration Card ची eKyc करण्याची गरज नाही.

>>> फक्त ज्यांच्या नावापुढे No आले आहे त्यांना मात्र e kyc करावी लागेल.

Ration Card eKyc कशी करावी?

रेशन कार्ड eKyc करण्यासाठी खली दिलेल्या स्टेप फॉलो करा.

टीप: रेशन कार्ड ची kyc सर्व सदस्यांना करावी लागते, केवळ कुटुंब प्रमुखाला kyc करायची नसते.

>>> सुरुवातीला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड घ्या.

>>> त्यानंतर सर्व सदस्यांना घेऊन तुमच्या गावातील किंवा जवळील रेशन दुकानात जा.

>>> तिथे रेशन दुकान चालकाला Ration Card eKyc करण्याची विनंती करा.

>>> सर्व सदस्यांचे आधार कार्ड दुकानदाराकडे द्या.

>>> एक एक करून रेशन दुकान चालक तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे अंगठे ई-पॉस मशीन वर घेईल.

>>> Verification पूर्ण झाल्यावर कुटुंबातील सर्व जणांचे Maharashtra Ration Card eKyc पूर्ण होईल.

Ration Card eKyc Last Date Maharashtra

रेशन कार्ड ची ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑक्टोबर 2024 आहे. या तारखेच्या आगोदर तुमची ration card kyc करून घ्या, अन्यथा तुमचे रेशन बंद होईल.

रेशन कार्ड ekyc करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, आगोदर 30 सप्टेंबर शेवटची तारीख होती, आता 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

त्यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुमची रेशन कार्ड kyc करून घ्या.

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Leave a Comment