महिलांना स्टार्टअप साठी मिळणार 25 लाख रुपये! महिला स्टार्टअप योजना जाहीर | Mahila Startup Yojana Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 2 Average: 3]

Mahila Startup Yojana: महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी अजून एक विशेष योजना सुरू केली आहे. त्यानुसार आता महिलांना तब्बल 25 लाख रुपया पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे.

स्टार्टअप, बिझनेस करू इच्छित असलेल्या महिलांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. सोबतच ज्या महिलांचा व्यवसाय Already आहे त्यांना 1 लाख ते 25 लाख रुपया पर्यंत आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.

योजनेचे नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, या संबंधी 9 जुलै 2024 रोजी अधिकृत GR देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.

शासन निर्णय आला आहे, त्यामुळे आता Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana साठी अर्ज देखील सुरू झाले आहेत.

यात एक चांगली बाब म्हणजे फॉर्म हे ऑनलाईन स्वरूपात सादर करायचे आहेत. त्यासाठी एक पोर्टल देखील शासनाने जारी केले आहे, त्यातच Online Apply करायचं आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना साठी कोणत्या महिला पात्र असणार? अटी, शर्ती आणि निकष कोणते आहेत? अर्ज कसा करायचा? लाभार्थी निवड कशाच्या आधारावर होणार? हे पण आर्टिकल मध्ये सविस्तर सांगितले आहे.

Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana

योजना राज्यात लागू झाली आहे, सोबत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पण सुरू झाली आहे. याची माहिती मी खाली स्टेप बाय स्टेप दिली आहे, एकदा काळजीपूर्वक प्रत्येक Section वाचून घ्या.

Help Tabel

योजनेचे नावपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना
अंमलबजावणीमहाराष्ट्र राज्य
विभागकौशल्य विकास व उद्योजकता विभाग
उद्देशमहिलांना स्टार्टअप बिझनेस सुरू करण्यास प्रोत्साहन देणे.
लाभ1 लाख ते 25 लाख रुपये आर्थिक सहाय्य
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Link Table

अधिकृत संकेतस्थळ@msins.in
ऑनलाईन अर्जApply Link
शासन निर्णयGR वाचा

Date Table

ऑनलाईन अर्जाची सुरुवात09 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख14 ऑगस्ट 2024

Punyashlok ahilyadevi holkar mahila startup yojana Qualification

Punyashlok ahilyadevi holkar mahila startup yojana Qualification
  • उद्योग स्टार्टअप हे महिला नेतृत्वात नोंदणी केलेले असावे.
  • स्टार्टअप मध्ये महिला या संस्थापक किंवा सह संस्थापक असाव्यात, अथवा बिझनेस मध्ये 51 टक्के हिस्सा असावा.
  • स्टार्टअप हे एका वर्षा पासून मार्केट मध्ये कार्यरत असावे.
  • स्टार्टअप चा वार्षिक Turn over हा किमान 10 लाख रु. ते 1 कोटी रु. पर्यंत असावा.
  • स्टार्टअप साठी यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेमधून अनुदान मिळवलेले नसावे.

Punyashlok ahilyadevi holkar mahila startup yojana Last Date

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप स्कीम साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑगस्ट 2024 आहे.

14 ऑगस्ट 2024 आगोदर सर्व पात्र महिला स्टार्टअप बिझनेस वूमन यांना अर्ज करायचा आहे. Last Date दिली आहे, एकदा तारीख निघून गेली की नंतर फॉर्म भरता येणार नाही, त्यामुळे सध्या अजून वेळ आहे. जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर अर्ज करून टाका.

Punyashlok ahilyadevi holkar mahila startup yojana Benefits

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अंतर्गत पात्र महिलांना (Business Woman) त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी सरकार द्वारे आर्थिक मदत केली जाणार आहे.

आर्थिक मदत ही फक्त एकदा सुरुवातीलाच केली जाणार आहे, एकरक्कमी मदत मिळणार आहे. योजनेसाठी अर्ज केल्यानंतर पात्र महिलांना त्यांच्या स्टार्टअप साठी पैसे भेटणार आहेत.

सरकार द्वारे केली जाणारी ही आर्थिक मदत स्टार्टअप वर अवलंबून असणार आहे. स्टार्टअप च्या वार्षिक उलाढाली वरून रक्कम ठरवली जाणार आहे.

योजनेद्वारे अर्जदार महिलांना किमान 1 लाख रुपये ते जास्तीत जास्त 25 लाख रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे.

Punyashlok ahilyadevi holkar mahila startup yojana Documents

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • कंपनीचा प्रस्ताव
  • कंपनी नोंदणीचे प्रमाणपत्र (MCA)
  • DPIIT मान्यता प्रमाणपत्र
  • ऑडिट रिपोर्ट
  • कंपनी लोगो
  • संस्थापकाचा फोटो
  • व्यवसायाचा फोटो (प्रोडक्ट or सर्विस)

Punyashlok ahilyadevi holkar mahila startup yojana Apply Online

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे. त्यासाठी अर्ज कसा करायचा? त्याची प्रक्रिया काय आहे? याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

Punyashlok ahilyadevi holkar mahila startup yojana Apply Online
  • सर्वात पहिल्यांदा तुम्हाला @msins.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्याची लिंक वर Link Table मध्ये दिली आहे.
  • वेबसाईट वर पोहोचल्यावर तेथे तुम्हाला Home Page वर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना या बॅनर वर क्लिक करायचे आहे. (किंवा तुम्ही Link Table मध्ये दिलेल्या Apply Link वर क्लिक करू शकता)
  • तुमच्या समोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा फॉर्म Open होईल, फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
  • सुरुवातीला संस्थापक महिलेची वैयक्तिक माहिती भरा नंतर स्टार्टअप ची माहिती भरून घ्या, Information Fill करताना विशेष काळजी घ्यायची आहे, चूक होऊ द्यायची नाही.
  • शेवटी वर सांगितल्या प्रमाणे आवश्यक असे सर्व कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करून घ्या, त्यानंतर एकदा फॉर्म तपासा.
  • मग फॉर्म खाली दिलेल्या Submit या बटणावर क्लिक करून Punyashlok ahilyadevi holkar mahila startup yojana Online Form सादर करून टाका.

योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया (अटी, शर्ती)

  • योजनेसाठी प्राप्त झालेल्या अर्जामधून केवळ नावीन्यपूर्ण, आश्वासक आणि प्रभावी अशा स्टार्टअप ला प्राधान्य दिले जाणार आहे.
  • जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणारा स्टार्टअप असेल, तर त्याला विशेष प्राधान्य असणार आहे.

ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर वरील निकषानुसार समिती द्वारे स्टार्टअप ची निवड करण्यात येणार आहे.
एकदा स्टार्टअप निवडला गेला की नंतर त्या स्टार्टअप ला आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय मार्फत आर्थिक (अनुदान) सहाय्यता दिली जाणार आहे.

Mahila Startup Yojana Maharashtra FAQ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Scheme साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत संकेतस्थळ वरून फॉर्म भरायचा आहे. अर्ज करण्याची पूर्ण माहिती वर आर्टिकल मध्ये नमूद केली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेद्वारे किती रुपये अनुदान मिळणार?

पात्र महिलांना या योजनेद्वारे तब्बल 1 लाख ते 25 लाख रुपये एवढे अनुदान मिळणार आहे. स्टार्टअप बिझनेस ला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार द्वारे हे आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.

Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana साठी ऑनलाईन फॉर्मची Last Date काय आहे?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 14 ऑगस्ट 2024 आहे.

Click to rate this post!
[Total: 2 Average: 3]

6 thoughts on “महिलांना स्टार्टअप साठी मिळणार 25 लाख रुपये! महिला स्टार्टअप योजना जाहीर | Mahila Startup Yojana Maharashtra”

  1. साई प्रेरणा अपार्टमेंट.A.409 अलकापुरी.नालेश्वर मंदिर.आचोळे रोड.नालासोपारा पुर्व

    Reply

Leave a Comment