Mukhyamantri Tirth Yatra Yojana Maharashtra: महाराष्ट्र शासनाद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी अभिनव अशी योजना सुरू करण्यात आली आहे, त्यानुसार आता वृद्ध जेष्ठ नागरिकांना मोफत देव दर्शन करता येणार आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना असे या योजनेचे नाव आहे, या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना देशातील सर्व तीर्थक्षेत्रांना भेटी देता येणार आहेत. तीर्थयात्रेचा पूर्ण खर्च राज्य सरकार द्वारे केला जाणार आहे.
मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना अंतर्गत प्रत्येकी 30 हजार रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेसाठी शासनाने GR प्रसिद्ध केला आहे, योजना सुरू झाली आहे. तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरावा लागणार आहे.
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Online Form भरणे सुरू झाले आहे, या योजनेसाठी पात्रता काय असणार? कागदपत्रे कोणती लागणार? फॉर्म कसा भरायचा? याची सविस्तर माहिती या लेखामध्ये दिली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचा.
Mukhyamantri Tirth Yatra Yojana Maharashtra
योजनेचे नाव | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना |
घोषणा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
अंमलबजावणी | 14 जुलै 2024 |
उद्देश | जेष्ठ नागरिकांना मोफत देव दर्शन घडवणे. |
लाभ | मोफत देवदर्शन सोबत रु. 30,000 चे अर्थसाहाय |
लाभार्थी | 60 वर्षा पेक्षा जास्त वयाचे नागरिक |
Mukhyamantri Tirth Yatra Yojana GR PDF
मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना महाराष्ट्र साठी शासनाने अधिकृत GR प्रसिद्ध केला आहे, शासन निर्णय प्रसिद्ध केल्यामुळे आता अधिकृतपणे योजनेचा शुभारंभ झाला आहे.
मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना महाराष्ट्र GR हा दिनांक 14 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांसाठी 60 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” राबविण्यास मान्यता देणेबाबत हा GR शासन निर्णय पारित करण्यात आला आहे.
Mukhyamantri Tirth Darshan Yojana GR Download Link
Mukhyamantri Tirth Yatra Yojana Eligibility
मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने काही अटी आणि शर्ती सांगितले आहेत त्यानुसार जेष्ठ नागरिकांना मोफत देव दर्शन यात्रेचा लाभ भेटणार आहे.
पात्रता निकष (अटी आणि शर्ती)
- लाभार्थी व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदार व्यक्तीचे वय हे 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
- अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रू. 2.50 लाखापेक्षा कमी असावे.
या तीन अटीमध्ये जे अर्जदार येतील त्यांना मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना महाराष्ट्र अंतर्गत मोफत देव दर्शन करता येणार आहे.
👉जेष्ठ नागरिकांना मिळत आहेत 3000 रुपये! येथून अर्ज करा
Mukhyamantri Tirth Yatra Yojana Benefits
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रा योजने साठी जे अर्जदार पात्र झाले आहेत त्यांना शासनाद्वारे वेगवेगळे लाभ देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा
- प्रति व्यक्ती ₹30,000 चे अर्थसहाय्य
- व्यक्ती वृद्ध असेल तर नातेवाईकापैकी एका व्यक्तीला सोबत जाता येणार
- विशेष रेल्वेने प्रवास
- जेवणाची सुविधा
- राहण्याची सुविधा
- मोफत कपडे
- आवश्यकते नुसार बस यात्रा
- तीर्थ स्थळावर गाईड आणि इतर सुविधा
Mukhyamantri Tirth Yatra Yojana List
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मध्ये समविष्ट तीर्थ स्थळ
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत समाविष्ट भारतातील तीर्थक्षेत्रे
मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेसाठी एकूण महाराष्ट्राबाहेर 43 देवस्थानांची निवड करण्यात आली आहे, लाभार्थी व्यक्तींना या सर्व 73 देवस्थानांची तीर्थयात्रा या योजनेअंतर्गत करता येणार आहे.
केदारनाथ | बद्रिनाथ |
अमरनाथ | काशी |
अयोध्या राम मंदिर | सोमनाथ मंदिर |
द्वारका | तिरुपती |
वैष्णवदेवी | अक्षरधाम |
कोणार्क सूर्य मंदीर | गंगोत्री मंदिर |
जगन्नाथ मंदिर | कामाख्यादेवी |
अजमेर दर्गा |
मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना लिस्ट मध्ये मी काही मुख्य तीर्थस्थळाची नावे दिली आहेत, या व्यतिरिक्त अजून 58 तीर्थस्थळ आहेत, यामध्ये जम्मू आणि काश्मीर, पंजाब, दिल्ली, उत्तराखंड, झारखंड, उत्तर प्रदेश, उडीसा, बिहार आसाम, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, राजस्थान या अशा 16 राज्यातील तीर्थस्थळांचा समावेश List मध्ये करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत समाविष्ट महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र
महाराष्ट्रात एकूण 66 तीर्थ स्थळांचा समावेश मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लिस्ट मध्ये करण्यात आला आहे. यामध्ये बरेच सुप्रसिद्ध असे मंदिर तसेच इतर धर्माचे तीर्थ स्थळ देखील देण्यात आले आहेत.
सिद्धिविनायक मंदिर | महालक्ष्मी मंदिर |
जेजुरी खंडोबा मंदिर | देहू |
आळंदी | पंढरपूर |
महागणपती रांजणगाव | शिखर शिंगणापूर |
जैन मंदिर कोल्हापूर | रेणुका देवी मंदिर नांदेड |
गुरू गोविंद सिंग, हुजुर साहिब, नांदेड | खंडोबा मंदिर, माळेगाव, नांदेड |
पैठण | त्र्यंबकेश्वर |
सप्तशृंगी मंदिर | काळाराम मंदिर |
शिर्डी साईबाबा मंदिर | शनी मंदिर, शनी शिंगणापूर |
गणपतीपुळे | महाकाली मंदिर, चंद्रपूर |
रामटेक | दीक्षाभूमी, नागपूर |
एकूण 66 तीर्थ स्थळांचा समावेश या लिस्ट मध्ये केला आहे, त्यापैकी काही मोजक्या मुख्य तीर्थस्थळांचा उल्लेख मी वर लिस्ट मध्ये केला आहे. अजून 44 तीर्थ स्थळ लिस्ट मध्ये देण्यात आले आहेत.
Mukhyamantri Tirth Yatra Yojana Required Documents
Mukhyamantri Teerth Darshan Yojana साठी अर्जदार उमेदवारांना काही आवश्यक कागदपत्रे सादर करायचे आहेत, आवश्यक कागदपत्रे सादर केले तरच फॉर्म भरता येणार आहे अन्यथा अर्जदाराचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
- लाभार्थी व्यक्तीचे आधार कार्ड
- कुटुंबाचे रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर
- अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
Mukhyamantri Tirth Yatra Yojana Apply Online
Form, Registration, Online Registration
मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना साठी अर्जदार व्यक्ती ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरू शकतात. योजनेसाठी शासनाद्वारे पोर्टल वेबसाईट बनवली जात आहे, सद्यस्थितीला पोर्टल चे आणि App चे काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे तुम्ही सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन फॉर्म भरू शकता.
👉60 ते 65 वर्षांच्या महिलांना मिळत आहेत महिन्याला रु. 1500
- सुरुवातीला तुम्हाला Mukhyamantri Tirth Darshan Yojana च्या अधिकृत पोर्टल वर यायचे आहे.
- पोर्टलवर आल्यानंतर Online Registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- तुमच्यासमोर योजनेचा फॉर्म उघडेल, फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
- त्यानंतर वर सांगितलेले आवश्यक कागदपत्रे फॉर्ममध्ये अपलोड करा.
- अर्जदाराची केवायसी करणे अनिवार्य आहे त्यासाठी Live Photo काढायचा आहे.
- KYC पूर्ण झाल्यानंतर फॉर्मसाठी दिलेल्या मोबाईल नंबर वर OTP येईल, तो OTP तुम्हाला टाकायचा आहे.
- फॉर्मचे व्हेरिफिकेशन Complete झाल्यावर तुम्हाला Submit बटणावर क्लिक करायचे आहे.
थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना साठी अधिकृत वेबसाईटवरून किंवा अँप वरून फॉर्म भरू शकता.
Note:
सध्या शासनाद्वारे योजनेचे पोर्टल किंवा ॲप तयार करण्यात आलेले नाहीये, त्यामुळे तुम्हाला सध्या तरी सेतू सुविधा केंद्रावर जाऊन फॉर्म भरावा लागणार आहे.
Mukhyamantri Tirth Yatra Yojana Labharthi Yadi
मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेसाठी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांची लाभार्थी यादी शासनाद्वारे अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केले जाणार आहे. यादीमध्ये ज्या अर्जदार व्यक्तीचे नाव असेल त्यांना मोफत देवदर्शनाचा लाभ भेटणार आहे.
लॉटरी पद्धतीने मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेची लाभार्थी यादी निवडली जाणार आहे, लॉटरीमध्ये ज्यांचा नंबर येईल त्यांना सुरुवातीला तीर्थयात्रा साठी नेले जाईल. एका गटाची तीर्थयात्रा समाप्त झाली की नंतर दुसऱ्या गटाची लॉटरी काढली जाईल, त्यानंतर अशा प्रकारे सर्व लाभार्थी व्यक्तींची तीर्थयात्रा शासनाद्वारे मोफत केली जाईल.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना साठी ज्या लाभार्थ्यांची निवड झाली आहे त्यांना रेल्वे, बस द्वारे तीर्थ यात्रा घडवली जाणार आहे. प्रवासाचे टेंडर अधिकृत टुरिस्ट कंपनी किंवा एजन्सी कडे देण्यात येणार आहे, त्यामुळे जेवण राहणे वैगेरे सर्व काही फ्री असणार आहे.
तर मित्रांनो ही होती महत्वाची अशी Mukhyamantri Tirth Yatra Yojana Maharashtra संबंधीची माहिती, मला अशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर ही पोस्ट Helpful वाटली असेल तर Please इतरांना पण शेअर करा.
ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज कुठे, केंव्हा आणि कसा करायचा आहे ? ते ह्या जाहिरातीत सांगितलेच नाही.
कृपया त्याची लिंक ह्या जाहिराती सोबत शेअर करावी. किंवा माझ्या मेल वर शेअर करावी ही विनंती आहे
सेतू सुविधा केंद्रावर अर्ज करायचा आहे, योजनेचे पोर्टल अजून आले नाहीये.
YA SAMBANDHATIL PDF FORM YOJANECHA KUTHE DISAT NAHI., KIVA TUMHI TAKLA NAHI., TAR MAG FORM KASA KAY BHARNAAR.
ajun yacha form aala nahiye, setu kendrat jaun choikshi kra. agent marfat form bhrle jat aahet.