नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे आता वसूल होणार आहेत, एक महत्वाची अशी अपडेट राज्य सरकार मार्फत वेबसाईट वर देण्यात आली आहे.
त्याच संदर्भात सविस्तर अशी माहिती या आर्टिकल मध्ये आपण पाहणार आहेत, नक्की कोणत्या महिलांचे पैसे वसूल होणार आहेत? आणि कोणत्या महिलांना पैसे मिळत राहणार आहेत?
लाडकी बहीण योजना नवीन अपडेट
राज्य सरकार मार्फत लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली, या योजनेचा लाभ राज्यातील तब्बल 2 कोटी महिलांनी घेतला. पण आता या योजने मध्ये एक मोठी अपडेट आली आहे, अपात्र महिलांना पोर्टल वर अलर्ट जारी केलं आहे.
जर तुमच्या नावापुढे पण अलर्ट आला तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार नाहीत. आणि जे पैसे आगोदर भेटले ते पण वसूल केले जाऊ शकतात.
कोणत्या महिला अपात्र आहेत?
ज्या महिलांनी आपले वय आधार वर वाढवून फॉर्म भरले आहेत, आणि ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो अशा महिला लाडकी बहीण योजना साठी अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.
वेबसाईट वरील अलर्ट कोणता आहे?
लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टल वर आता नवीन दोन ऑप्शन आले आहेत, त्यापैकी एक ऑप्शन हा संजय गांधी निराधार योजना संबंधी आहे, जर महिलांच्या नावापुढे YES आले असेल तर अशा महिलांना योजनेचा लाभ आता यापुढे दिला जाणार नाही.
सोबत जर तुमच्या नावापुढे NO असं येत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही निराधार योजनेचा लाभ घेत नाही आहात, त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येत राहणार आहेत.
फक्त ज्यांच्या नावापुढे YES आले आहे, त्यांचेच नाव लाडकी बहीण योजनेतून काढून टाकले जाणार आहे. सोबत इथून पुढचे हप्ते देखील या महिलांना मिळणार नाहीत, आणि जेवढे हप्ते आगोदर भेटले आहेत ते पण वसूल केले जाऊ शकतात.
कारण नियमानुसार महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत असताना, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आणि त्याचा फायदा पण घेतला.
त्यामुळे आता ज्यांना YES आले आहे, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे भेटणार नाही. आणि जर तुम्हाला अजून कोणता हप्ता आला नसेल तर आता पुढेचे हप्ते पण येणार नाहीत.
दुसऱ्या ऑप्शन मध्ये महिलांना किती पैसे पडले याची Transaction Details दिली गेली आहे. म्हंजे तुम्हाला आता पर्यंत लाडकी बहीण योजने अंतर्गत किती पैसे मिळाले याची माहिती या ऑप्शन च्या आधारे तुम्ही पाहू शकता.