Google Pay Personal Loan: आता कर्जासाठी बँकेच्या फेऱ्या मारायची गरज नाही… कारण आता थेट Google Pay (GPay) वरूनच Personal Loan मिळणार आहे!
होय! Google Pay ने L&T Finance सोबत भागीदारी केली आहे आणि त्यामुळे पात्र ग्राहकांना अॅपमधूनच काही क्लिकमध्ये कर्ज उपलब्ध होणार आहे.
त्यासंदर्भातच सविस्तर अशी माहिती मी तुम्हाला या आर्टिकल मध्ये देणार आहे, त्यामुळे जर तुम्हाला Instant Personal Loan पाहिजे असेल तर हे आर्टिकल काळजीपूर्वक शेवट पर्यंत नक्की वाचा.
Google Pay Personal Loan म्हणजे काय?
Google Pay Personal Loan म्हणजे Google Pay या मोबाईल पेमेंट अॅपच्या माध्यमातून वापरकर्त्यांना थेट वैयक्तिक कर्ज घेण्याची सोय. यासाठी Google Pay ने देशातील आघाडीच्या नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी म्हणजेच L&T Finance Limited सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे ग्राहकांना बँकेत जाऊन लांबलचक प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज राहणार नाही. काही क्लिकमध्ये Google Pay अॅपवरूनच कर्जासाठी अर्ज करता येतो आणि मंजुरी मिळाल्यावर रक्कम थेट बँक खात्यात जमा होते.
ही सेवा पूर्णपणे डिजिटल असल्यामुळे प्रक्रिया वेगवान आणि सोपी आहे. ग्राहकांना फक्त आवश्यक माहिती भरून अर्ज करावा लागतो आणि त्यांच्या पात्रतेनुसार कंपनी त्यांचा अर्ज तपासते. पारंपरिक कर्ज प्रक्रियेत जसा वेळ आणि कागदपत्रांचा त्रास होतो तसा येथे होत नाही. Google Pay वरून मिळणारे कर्ज हे ग्रामीण तसेच शहरी दोन्ही भागांतील वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे.
Google Pay Personal Loan In Marathi
कर्ज देणारी कंपनी | L&T Finance Ltd |
प्लॅटफॉर्म | Google Pay App |
कर्जाची रक्कम | 10 हजार ते 10 लाख रुपये + |
कर्जावरील व्याजदर | Credit Score नुसार कमी जास्त |
कर्ज प्रकार | वैयक्तिक कर्ज (Personal Loan) |
प्रक्रिया | 100% डिजिटल, Instant मंजुरी |
Google Pay Personal Loan Eligibility
Google Pay वरून Loan घेण्यासाठी साधारण स्वरुपात खालील प्रमाणे पात्रता निकष आहेत:
- अर्जदार व्यक्ती हा भारतीय नागरिक असावा.
- त्याचे वय हे साधारण 21 ते 58 वर्षे असावे.
- त्याच्याकडे स्थिर स्वरुपाच उत्पन्न / पगार किंवा Business असणे आवश्यक.
- त्याचबरोबर Google Pay App वर Active खाते असणे गरजेचे आहे.
Google Pay Personal Loan App वरून किती रुपये कर्ज मिळू शकते?
Google pay personal loan amount हि व्यक्ती परत्वे कमी जास्त होते, पण साधारण स्वरुपात किमान 10,000 रु. पासून ते 10,00,000 लाख रुपये एवढी personal loan amount हि तुम्हाला मिळू शकते.
- कर्ज रक्कम अर्जदाराच्या पात्रतेनुसार ठरवली जाते.
- सामान्यतः ₹10,000 पासून ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
- व्याजदर व हप्त्यांची (EMI) माहिती अर्ज करतानाच दिली जाते.
Google Pay Loan Apply Online Process
Google Pay वरून ऑनलाईन स्वरुपात Loan घेण्यासाठीची प्रक्रिया हि खालील प्रमाणे आहे. स्टेप बाय स्टेप माहिती इथे दिली आहे, सोबतच google pay personal loan process हि व्हिडियो च्या माध्यमातून आपल्या युट्युब चानेल वर पण सांगितली आहे. व्हिडियो Google Pay Loan Apply Online च्या खाली दिला आहे, व्हिडियो बघा आणि गुगल पे लोन पाहिजे असेल तर अर्ज करून टाका.
- Google Pay अॅप उघडा
- “Personal Loan” पर्याय निवडा
- आवश्यक माहिती भरा (उत्पन्न, ओळखपत्र इ.)
- L&T Finance कडून कर्ज मंजुरी प्रक्रिया सुरू होईल.
- मंजुरीनंतर रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल.
Google Pay Personal Loan FAQs
Q1. Google Pay वरून खरंच कर्ज मिळणार आहे का?
👉 होय, L&T Finance च्या भागीदारीतून थेट Personal Loan उपलब्ध होणार आहे.
Q2. कर्जासाठी कोणते कागदपत्र लागतील?
👉 सामान्यतः ओळखपत्र, पत्ता पुरावा आणि उत्पन्नाचा पुरावा मागितला जातो.
Q3. व्याजदर किती असतील?
👉 व्याजदर अर्जदाराच्या क्रेडिट स्कोर आणि पात्रतेनुसार ठरतील.
Q4. कर्ज किती दिवसांत मिळेल?
👉 प्रक्रिया डिजिटल असल्याने काही तासांत ते काही दिवसांत कर्ज मंजूर होऊ शकते.
Q5. ही सुविधा सर्वांना मिळेल का?
👉 नाही, फक्त पात्र ग्राहकांनाच ही सुविधा मिळेल.