Hyderabad Gazette In Marathi (PDF Download) Full Information

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Hyderabad Gazette In Marathi: नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा चिघळला आहे, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई मध्ये उपोषण सुरु केल्यापासून मोठ्या प्रमाणात लोक Hyderabad Gazette काय आहे? त्याच्यात काय लिहील आहे, आणि Hyderabad Gazette In Marathi PDF Download कुठून करावी हे सर्च करत आहेत.

त्याच संदर्भात हा महत्वाचा असा लेख आहे, या आर्टिकल मध्ये मी hyderabad gazette information in marathi ची पूर्ण माहिती दिली आहे. सोबतच hyderabad gazette pdf कुठून डाउनलोड करायची त्याची पण माहिती दिली आहे.

Hyderabad Gazette In Marathi ची डायरेक्ट Download Link आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे, त्यामुळे हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा, त्यानंतर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Hyderabad Gazette Download करा.

Hyderabad Gazette Information In Marathi

हैदराबाद गॅझेट हा १९१८ मध्ये हैदराबाद निजामशाही सरकारने काढलेला एक शासकीय आदेश आहे. या आदेशात हिंदू मराठा समाजाला मागासवर्गीय म्हणून मान्यता देण्यात आली होती आणि त्यांना शिक्षण व सरकारी नोकरीत आरक्षणाचा लाभ मिळावा असे जाहीर केले होते. त्यामुळे हा गॅझेट आज मराठा समाज मागास असल्याचा ऐतिहासिक व अधिकृत पुरावा मानला जातो. सध्या महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या चळवळीत हाच गॅझेट सर्वात महत्त्वाचा कागदपत्रीय आधार मानला जातो आहे.

मुद्दामाहिती
गॅझेट प्रसिद्धी वर्ष१९१८
गॅझेट कुठे लागू होतंहैद्राबाद निजामशाही राज्य (मराठवाडा प्रदेशासह)
कोणत्या समाजाचा उल्लेख आहेकुणबी समाज
कोणत्या समाजाचा उल्लेख नाहीमराठा समाज
नोंद कशी आहेकुणबी समाजाला शेतीप्रधान व मागास म्हणून दाखवले गेले.
परिणाममराठा समाजाचा थेट उल्लेख नसल्यामुळे पुढे कुणबी व मराठा ओळख यावर वाद निर्माण झाले.

Hyderabad Gazette PDF Download

Hyderabad Gazette PDFDOWNLOAD LINK

हैदराबाद गॅझेट म्हणजे काय?

हैदराबाद राज्य (निजामशाही काळातले जुने संस्थान) याचे अधिकृत शासकीय वृत्तपत्र (Official Government Gazette) म्हणजेच हैदराबाद गॅझेट होय.

सरकार जेव्हा एखादा नवीन कायदा, नियम, आदेश, जाहीरात, सूचना, पदभरती, सरकारी नियुक्त्या, कर आकारणी किंवा शासन निर्णय काढते, तेव्हा ते सर्वसामान्य लोकांना कळावे म्हणून अधिकृतरीत्या छापून प्रसिद्ध केले जाते. या छापील दस्तावेजाला गॅझेट असे म्हणतात.

त्यामुळे –

  • हैदराबाद निजामशाहीकडून काढले जाणारे हे अधिकृत सरकारी कागदपत्र म्हणजेच हैदराबाद गॅझेट.
  • यात सरकारने घेतलेले निर्णय, बदल, आदेश, नवीन धोरणे यांची नोंद अधिकृत स्वरूपात प्रसिद्ध केली जायची.
  • साध्या भाषेत सांगायचे झाल्यास, आज जसे “भारत सरकारचे गॅझेट” किंवा “महाराष्ट्र शासन राजपत्र” असते, तसेच जुन्या काळी निजामशाही राज्याचे अधिकृत राजपत्र म्हणजेच हैदराबाद गॅझेट.

हैद्राबाद गॅझेटमध्ये कुणबी समाजाचा उल्लेख, मराठ्यांचा नाही

हैद्राबाद निजामशाही सरकारने १९१८ मध्ये काढलेल्या गॅझेटमध्ये मराठवाडा प्रदेशातील समाजघटकांची नोंद करण्यात आली होती. या गॅझेटमध्ये कुणबी समाजाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे, परंतु “मराठा” हा शब्द वापरलेला नाही. त्या काळात शेतीवर अवलंबून असलेल्या कुणबी समाजाला मागासवर्गीय म्हणून दाखवले गेले. त्यामुळे ऐतिहासिक नोंदींमध्ये मराठा समाजाचा थेट उल्लेख आढळत नाही, तर कुणबी या नावानेच त्या वर्गाची नोंद करण्यात आली आहे.

त्यामुळे यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते कि आगोदर जर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कुणबी होते तर मग आता का नाहीत? एकदम सर्वजण मराठा कसे झाले? बाकी कुणबी कुठे गेले?

याठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे, आगोदर मराठा हि कुठली जात नव्हती. शिवाजी महाराजांच्या काळात सर्व बहुजन आठरा पगड जातींना मराठा म्हंटल जायचं! शिवरायांच्या दफ्तरी असणारे ब्राम्हण सुद्धा स्वतः ला मराठा म्हणवत. मग पुढे चालून मराठा शब्द वापरणे प्रतिष्ठेची गोष्ट बनली, मग हळू हळू लोकांनी आपली जात सांगताना त्याच्या पुढे मागे मराठा लावण सुरु केल.

त्यातूनच (मराठा – कुणबी) (कुणबी – मराठा) असा अपभ्रंश झाला, मग काहीजणांनी कुणबी नावच काढून टाकत फक्त मराठा म्हणून घ्यायला सुरुवात केली. मग अशा तर्हेने महाराष्ट्रात नवीन मराठा जात तयार झाली.

आज पण मोठ्या प्रमाणात मराठा समाज शेती करतो आगोदर पासून शेती करणाऱ्याला कुणबी म्हणत, पण आपल्या पूर्वजांनी चुका केल्या, कागदोपत्री जात म्हणून मराठी/मराठा अस लिहून दिल. त्याचे परिणाम आता आपल्याला भोगावे लागत आहेत.

त्यामुळेच Hyderabad Gazette हे खूप महत्वाचे आहे, मराठा समाजाला जर OBC मधून आरक्षण मिळवायचं असेल तर त्याचा एक मात्र ठोस आणि कणखर पुरावा हा Hyderabad Gazette चाच आहे.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

माझे नाव श्रीकांत शिंदे आहे, मी या ब्लॉग चा लेखक आहे. या ब्लॉग मध्ये तुम्हाला Finance, Loan, Credit Card, Zero Balance Account याची माहिती मिळेल.

Leave a Comment