Anganwadi Bharti 2025: अंगणवाडी मध्ये भरती सुरू झालेली आहे, महाराष्ट्र महिला व बालविकास विभागामार्फत Anganwadi Bharti 2025 Maharashtra यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
तब्बल 18882 रिक्त जागा या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत, ऑफलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे. ज्या महिलांना इच्छा आहे त्या महिला फॉर्म भरू शकतात.
या भरतीसाठी पात्रता निकष काय आहेत वयाची अट काय असणार फॉर्म कसा भरायचा (anganwadi bharti 2025 maharashtra online apply date) निवड प्रक्रिया काय आहे अशी सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये दिलेली आहे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा आणि नंतर फॉर्म भरा.
Anganwadi Bharti 2025
भरतीचे नाव | anganwadi bharti 2025 |
पदाचे नाव | अंगणवाडी सेविका, मदतनीस |
रिक्त जागा | 18,882 |
नोकरीचे ठिकाण | स्वतःच्या गावात (महाराष्ट्र) |
पात्रता | 12 वी पास |
वयाची अट | 18 ते 35 वर्षे |
भरती फी | नाही |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
Maharashtra Anganwadi Bharti 2025
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
अंगणवाडी सेविका | 5,639 जागा |
अंगणवाडी मदतनीस | 13,243 जागा |
एकूण रिक्त जागा | 18,882 |
अंगणवाडी भरती पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता – 12वी पास
वयाची अट – 18 ते 35 वर्षे
- अर्जदार महिला स्थानिक रहिवासी असावी.
- बारावी पर्यंत किमान शिक्षण झालेले असावे.
- यासोबत कॉम्प्युटरचे सामान्य ज्ञान असावे.
- MS-CIT कम्प्युटर कोर्स केलेला असावा.
अंगणवाडी भरती साठी लागणारी कागदपत्रे
- बारावी पास मार्क मेमो
- MS-CIT प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावी मार्क मेमो)
अर्ज कसा करायचा?
अर्जाची सुरुवात (Starting Date) | 14 फेब्रुवारी 2025 |
Anganwadi Bharti 2025 Last Date | 02 मार्च 2025 |
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येणार नाही, फक्त ऑफलाईन स्वरूपात अर्ज स्वीकारले जाणार आहे.
ऑफलाइन स्वरूपात महिलांना “बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प” या ठिकाणी जाऊन फॉर्म आणि सोबतचे कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.
याशिवाय तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महिला व बालविकास विभागांमध्ये देखील अर्ज सादर करू शकता.
अर्जाची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
- तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन भरतीचा फॉर्म मिळवा.
- त्यामध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
- वर सांगितल्याप्रमाणे आवश्यक असे कागदपत्रे फॉर्म सोबत जोडा.
- त्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे तुमचा अंगणवाडी भरतीचा फॉर्म सबमिट करा.
निवड कशी होणार?
अंगणवाडी भरती प्रक्रियेत निवड प्रक्रिया ही विनापरीक्षा होणार आहे, म्हणजेच ज्या महिलांना त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रावर जास्तीत जास्त गुण असतील त्यांना निवडले जाणार आहे.
बारावी पास वर ची अंगणवाडी भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे, याशिवाय बारावी पेक्षा जास्त शिक्षण घेतला असेल जसे की पदवीधर, पदव्युत्तर, डी एड, बीएड, तर अशा परिस्थितीमध्ये देखील तुम्हाला प्राधान्य दिल जाणार आहे.
भरती संदर्भात कोणत्याही स्वरूपाची जर अडचण असेल शंका असतील तर आम्हाला कमेंट मध्ये विचारा, याशिवाय तुम्हाला वाटलं तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप पण जॉईन करू शकता तेथे तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करून देखील तुमची शंका विचारू शकता.
याशिवाय आपल्या यूट्यूब चैनल वर अंगणवाडी भरती 2025 संदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडिओ देखील टाकलेला आहे, तो व्हिडिओ पाहून देखील तुम्ही अंगणवाडी भरतीसाठी फॉर्म भरू शकता.