शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अशी अपडेट आली आहे, आता Rabbi Pik Vima 2024 साठी फॉर्म भरणे सुरू झाले आहे.
शेतकऱ्यांना 1rs rabbi pik vima भरता येणार आहे, म्हणजे पीक विमा भरण्यासाठी यंदा पण फक्त 1 रुपया भरायचा आहे.
शेतकऱ्यांना CSC केंद्रावर जायची पण आता गरज नाहीये, शेतकरी स्वतः पण पीक विमा भरू शकणार आहेत.
जर तुम्ही रब्बी हंगामाचे कोणते पीक घेतले असेल, तर लगेच Rabbi Pik Vima भरून घ्या. रब्बी हंगामाचा पीक विमा कसा भरायचा? याची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये मी दिली आहे, यासोबत Rabbi Pik Vima 2024 Start Date आणि Rabbi Pik Vima 2024 Last Date याची पण माहिती सांगितली आहे.
Rabbi Pik Pera 2024 PDF पण या आर्टिकल मध्ये डाउनलोड करण्यासाठी दिली आहे. Rabbi Pik Vima 2024 साठी All in one article आहे, त्यामुळे सविस्तर माहिती वाचा.
Rabbi Pik Vima 2024
रब्बी हंगामाचा पिक विमा सुरू झाला आहे, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा विमा उतरवण्याचे आवाहन सरकारद्वारे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने यापूर्वी एक रुपयांमध्ये पिक विमा भरण्याची योजना सुरू केली होती, ती आता चालूच राहणार आहे, त्याच योजनेचा लाभ तुम्हाला यंदा देखील रब्बी हंगामात मिळणार आहे.
Rabbi Pik Vima 2024 Start Date
रब्बी पीक विमा भरण्याची सुरुवात ही 01 नोव्हेंबर 2024 पासून झाली आहे, शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा पिक विमा भरण्यासाठी यांना खूप जास्त कालावधी देण्यात आला आहे.
एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत शेतकऱ्यांना रब्बी पिक विमा भरता येणार आहे. सध्या राज्यामध्ये आचारसंहिता लागू आहे सोबतच आता निवडणुका देखील येत आहेत त्यामुळे यामध्ये बदल करण्यात आला आहे.
निवडणुकीमुळे रब्बी पिक विमा भरण्यासाठी कोणत्या स्वरूपाची अडचण येऊ नये यासाठी सरकार द्वारे शेतकऱ्यांना एवढी मुदत देण्यात आली आहे.
Rabbi Pik Vima 2024 Last Date
रब्बी पिक विमा 2024 साठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 15 डिसेंबर 2024 असणार आहे.
शेतकऱ्यांना 15 डिसेंबर पर्यंत त्यांचा पिक विमा भरता येणार आहे. 1 नोव्हेंबर पासून पिक विमा भरण्याची सुरुवात झाली आहे, 15 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे.
दीड महिन्याची मुदत रब्बी पिक विमा देण्यात आली आहे, rabbi pik vima last date संपण्यापूर्वी तुमचा रब्बी हंगामाचा पिक विमा उतरून घ्या.
Rabbi Pik Vima Document List
रब्बी पिक विमा भरण्यासाठी खाली सांगितलेले कागदपत्रे लागणार आहेत.
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- सातबारा उतारा
- होल्डींग 8 अ
- बँक पासबुक
- पिक पेरा स्वयंघोषणापत्र
Rabbi Pik Vima 2024 Application Process
रब्बी पिक विमा भरण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप फॉलो कराव्या लागतील.
सुरुवातीला प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
त्यानंतर फार्मर कॉर्नर या ऑप्शन वर क्लिक करा.
तिथे गेल्यानंतर लॉगिन फॉर फार्मर वर क्लिक करा.
त्यानंतर मोबाईल नंबर टाकून ओटीपी व्हेरिफिकेशन करून लॉगिन करा.
त्यानंतर आपला apply for insurance वर क्लिक करा रब्बी पिक विमा योजनेचा फॉर्म उघडेल.
फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
त्यानंतर फॉर्म चा preview पहा काही चूक झाली असेल तर दुरुस्त करा.
शेवटी 1 रुपया पेमेंट करून, Rabbi Pik Vima 2024 Application Form Submit करा.
जर तुम्हाला स्वतःहून रब्बी पिक विमा योजनेचा फॉर्म भरता येत नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळील CSC केंद्रावर देखील जाऊन रब्बी पिक विमा 2024 भरू शकता.