Voter ID Card Online Apply: नमस्कार मित्रांनो आता महाराष्ट्र मध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत, त्यासाठी जर तुमचं वय आता 18 वर्षे झालं असेल तर तुम्हाला मतदान कार्ड काढावे लागणार आहे.
जर तुम्हाला मतदान कार्ड काढायचे असेल, तर या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.
मतदान कार्ड काढण्यासाठी आता फक्त एकच दिवस शिल्लक आहे, 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत नवीन मतदार नोंदणी करता येणार आहे.
त्यामुळे वेळ कमी आहे, तुमचे जर वय 18 वर्षे झाले असेल तर लगेच मतदान कार्ड काढून घ्या.
Voter ID Card Online Apply
- सर्वात पहिल्यांदा तुम्हाला राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल वर जायचं आहे.
- तिथे तुम्हाला Registrer अस a new user या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
- डावीकडे सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे रजिस्टर ऍज न्यू इलेक्टर/ वोटर यावर क्लिक करा.
- फॉर्म नंबर 6 ओपन होईल, तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे.
- फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्यायची आहे, सोबतच तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे.
- पुरावा म्हणून जे कागदपत्र तुम्ही जोडणार आहात ते पण तुम्हाला अपलोड करायचे आहे.
- त्यानंतर खाली Captcha Code टाकून फॉर्म रिव्ह्यू करा, काही चुकलं असेल तर ते दुरुस्त करा.
- एकदा का माहिती सबमिट केली की नंतर ते दुरुस्त करता येत नाही त्यामुळे आताच सर्व गोष्टी पाहून घ्या.
- फॉर्म रिव्ह्यू केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून Voter ID Card Online Apply चा फॉर्म Submit करा.
एकदा का फॉर्म सबमिट केला की नंतर तुमच्या ईमेल आयडीवर किंवा मोबाईल नंबर वर एक फॉर्मचा Application Number येईल तो तुम्हाला तुमचा एप्लीकेशन ट्रॅक करण्यासाठी वापरता येतो.
ऑनलाइन स्वरूपात मतदान कार्ड काढल्यानंतर तुमच्या घरी निवडणूक आयोगाचे अधिकारी येतील, तेव्हा ती तुमची पुढील प्रक्रिया पूर्ण करतील. याचवेळी तुमचे नाव मतदार यादी मध्ये देखील टाकले जाईल.
तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला मतदान कार्ड कसे काढावे Online? Voter ID Card Online Apply ची माहिती समजली असेल.
ही जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, सोबतच ज्यांचे वय 18 वर्षे झाली आहे त्यांना देखील ही पोस्ट पाठवा, जेणेकरून त्यांना पण त्यांचं मतदान कार्ड काढता येईल.