मुख्यमंत्री – वयोश्री योजना 2024 फॉर्म PDF, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया Mukhymantri Vayoshri Yojana 2024

Mukhymantri Vayoshri Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 4 Average: 3]

Mukhymantri Vayoshri Yojana 2024: आता महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येकी ₹3000 मिळणार आहेत. या संदर्भात अधिकृत घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये केली आहे.

केंद्र सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय वयोश्री योजना च्या धर्तीवर आता महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवली जात आहे.

या योजनेच्या माध्यमातून वृध्द नागरिकांना म्हातारपणी सहायता म्हणून काही उपयुक्त असे उपकरणे खरेदी करण्यासाठी ₹3,000/- ची आर्थिक सहायता देण्यात येते.

Mukhymantri Vayoshri Yojana 2024 काय आहे? या योजनेसाठी कोणते व्यक्ती पात्र असणार? लाभ कोणते मिळणार? आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत? अर्ज कसा करायचा? याची पूर्ण माहिती आर्टिकल मध्ये मी दिली आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र चा लाभ घेण्यासाठी हा लेख काळजीपूर्वक वाचा.

वयोश्री योजना फॉर्म PDF, अर्ज प्रक्रिया खाली सविस्तरपणे सांगितली आहे.

Mukhymantri Vayoshri Yojana 2024 काय आहे?

योजनेचे नावमुख्यमंत्री वयोश्री योजना 2024
घोषणामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत
अंमलबजावणीमहाराष्ट्र राज्यात
उद्देशवृध्द नागरिकांना उपकरणे खरेदी साठी आर्थिक मदत
लाभ₹3,000/- रोख मदत
लाभार्थीमहाराष्ट्रातील वृध्द नागरिक
अर्ज प्रक्रियाऑनलाईन /ऑफलाईन
अधिकृत संकेतस्थळअद्याप उपलब्ध नाही

मुख्यमंत्री वयोश्री योजने साठी महाराष्ट्राच्या कॅबिनेट बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृत घोषणा केली, मुळात योजनेची घोषणा ही दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आली होती.

सोबत mukhyamantri vayoshri yojana gr pdf देखील पारित करण्यात आली आहे, परंतु त्यावेळी बऱ्याच नागरिकांना या योजनेची माहिती नव्हती. पण आता माझी लाडकी बहीण योजना मुळे बरेच लोक जागरूक झाले आहेत. त्यामुळे आता महिलांसोबत वृध्द नागरिकांना देखील याचा मोठा फायदा मिळणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 साठी कोण पात्र आहे?

राज्य शासनाने Mukhymantri Vayoshri Yojana Maharashtra ही फक्त वृध्द नागरिकांसाठी सुरू केली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व वृध्द नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

काही नाममात्र अटी आणि शर्ती या मुख्यमंत्री वयोश्री योजना साठी ठेवण्यात आल्या आहेत. बाकी जर तुम्ही या सर्व अटी मध्ये येत असाल तर तुम्हाला Vayoshri Yojana चा लाभ नक्कीच मिळेल.

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे वय हे 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
  • अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड असावे.
  • लाभार्थी अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ₹2 लाख पेक्षा कमी असावे.
  • योजनेमध्ये महिलांना 30% आरक्षण आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 साठी वयोमर्यादेची जी अट दिली आहे, त्यात जर अर्जदार व्यक्तीचे वय दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी 65 वर्षे पूर्ण झाले असेल तरच अर्जदार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 चे फायदे कोणते आहेत

Mukhymantri Vayoshri Yojana अंतर्गत महाराष्ट्रातील तब्बल 15 लाख वृध्द नागरिकांना उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक लाभार्थी व्यक्तीला ₹3000/- प्रमाणे पैसे मिळणार आहेत.

लाभार्थी व्यक्तीला थेट लाभ मिळावा या उद्देशाने DBT मार्फत अर्जदार व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत. योजने अंतर्गत दरवर्षी हा लाभ देण्यात येणार आहे.

1500 रु. महिन्याला मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

या Mukhymantri Vayoshri Yojana साठी शासनाने वार्षिक 480 करोड रुपये एवढं बजेट निर्धारित केलं आहे. राज्यातील जिल्हा पातळीवर ही योजना राबवली जाणार आहे, जिल्ह्या नुसार योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

यात शासनाने एक मुख्य बाब सांगितली आहे, त्यानुसार मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे पैसे वृद्धांच्या उपकरणांवरच खर्च झाले आहेत की नाही याची पडताळणी देखील केली जाणार आहे. त्यामुळे एकप्रकारे वृध्द लोकांसाठी याची मोठी मदत होणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 साठी आवश्यक कागदपत्रे

राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या Mukhymantri Vayoshri Yojana Maharashtra साठी काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. अर्ज सादर करताना या कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजना कागदपत्रे यांची यादी खाली दिली आहे.

  • आधार कार्ड / मतदान कार्ड
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  • पासपोर्ट फोटो 2
  • स्वयं-घोषणापत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • रेशनकार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 अंतर्गत मिळणारे उपकरणे

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र साठी शासन वृध्द नागरिकांना ₹3000 देत आहे, या पैशाद्वारे वृध्दांना त्यांच्या गरजेचे उपकरणे खरेदी करता येणार आहेत.

बुजुर्ग वृध्द नागरिकांना त्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी खूप झगडावे लागते, म्हातारपणी अनेक त्रास होतात, आरोग्य चांगल राहत नाही. त्यामुळे जर वृध्दांना आवश्यक असे उपकरणे मिळाले तर त्यांना नक्कीच यामुळे फायदा होतो.

Mukhymantri Vayoshri Yojana साठी काही उपकरणांची यादी देण्यात आली आहे, जी तुम्ही खाली पाहू शकता. सोबत यापैकी कोणतेही उपकरणे किंवा वस्तू वृध्द नागरिकांना घेता येते.

  • चष्मा
  • श्रवणयंत्र
  • ट्रायपॉड
  • स्टिक व्हील चेअर
  • फोल्डिंग वॉकर
  • कमोड खुर्ची
  • नि-ब्रेस
  • लंबर बेल्ट
  • सर्वाइकल कॉलर

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 साठी अर्ज कसा करायचा?

जर तुम्हाला Mukhymantri Vayoshri Yojana साठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही दोन प्रकारे फॉर्म भरू शकता. एक म्हणजे ऑनलाईन आणि दुसरा म्हणजे ऑफलाईन, ऑनलाईन फॉर्मची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाहीये, ऑफलाईन अर्ज मात्र सुरू झाले आहेत.

Mukhyamantri Vayoshri Yojana Form PDF

अर्जाचा नमुनाForm PDF Download करा
अर्जदाराचे स्वयंघोषणापत्र स्वयंघोषणापत्र Download करा

Mukhyamantri Vayoshri Yojana Application Form

मुख्यमंत्री वयोश्री योजना साठी अर्जदार व्यक्तींना खाली दिलेल्या स्टेप आधारे फॉर्म भरायचा आहे.

  • सुरुवातीला वर दिलेला अर्जाचा नमुना आणि स्वयंघोषणापत्र डाउनलोड करून घ्या.
  • फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
  • स्वयंघोषणापत्र भरा, सही वगैरे करून घ्या.
  • आवश्यक असे सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडा.
  • आणि तुमच्या जिल्ह्याच्या समाजकल्याण विभाग कार्यालयात जाऊन अर्ज जमा करा.

जिल्हास्तरावर समाजकल्याण विभागातर्फे अर्ज मंजूर केले जात आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचा अर्ज हा समाजकल्याण विभागातच सादर करावा लागणार आहे. अजून वयोश्री योजनेचे अधिकृत पोर्टल आले नाही, त्यामुळे तुम्हला वेबसाईट येई पर्यंत ऑफलाईन स्वरुपात अशाच प्रकारे अर्ज सादर करायचा आहे.

Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online

ऑनलाईन फॉर्मची लिंक अजून सुरू झाली नाहीये शासनाद्वारे या योजनेसाठी पोर्टल विकसित करण्यात येत आहे. Vayoshri Yojana 2024 चे Official Portal लवकरच Launch केले जाणार आहे. त्यावेळी तुम्ही थेट पोर्टल वरून पण अर्ज करू शकता.

याआधी ऑनलाईन स्वरूपात गुगल फॉर्म द्वारे अर्ज स्वीकारले जात होते, त्याची लिंक https://tinyurl.com/ue7d9sc हि आहे. पण आता हि लिंक expire झाली आहे, त्यामुळे तुम्ही या लिंक वरून अर्ज करू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला अधिकृत पोर्टल सुरु होई पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

शासकीय शिबिर

या सोबत अजून एक अर्ज करण्याची प्रक्रिया सांगितली गेली आहे, यात जिल्ह्यानुसार शासन योजनेचे शिबिर आयोजित करणार आहे. त्या शिबिरात वृध्द व्यक्तींना आपला फॉर्म भरता येणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 हेल्पलाईन नंबर

जर तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 महाराष्ट्र साठी अर्ज करण्यास कोणती अडचण येत असेल, तर तुम्ही थेट योजनेच्या हेल्पलाईन नंबर वर कॉल करून त्यासंबंधी विचारणा करू शकता.

राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी 18001805129 हा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. या नंबर वर तुम्ही स्वतः फोन लावून चौकशी करू शकता.

Helpline वर कॉल करून पण जर तुम्हाला मदत मिळत नसेल, तर या आर्टिकल खाली कमेंट करा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देईन. अधिक माहिती साठी तुम्ही मला व्हॉटसॲप वर पण Chat करू शकता, त्यासाठी तुम्हाला MahaHelpline WhatsApp Group Join करावा लागेल.

Yojana FAQs

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र साठी कोण पात्र आहे?

Mukhymantri Vayoshri Yojana साठी महाराष्ट्रातील सर्व 65 वर्षापेक्षा जास्त वयाचे वृध्द नागरिक पात्र असणार आहेत. योजनेसाठी केवळ वय 65 असून चालणार नाही, तर इतर पण काही निकष आहेत, त्याची माहिती वर आर्टिकल मध्ये दिली आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 अंतर्गत किती रुपये मिळणार?

या योजनेसाठी जे नागरिक पात्र झाले आहेत, त्यांना उपकरणे खरेदी साठी ₹3000 आर्थिक मदत दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

CM Vayoshri Yojana साठी ऑनलाईन ऑफलाईन माध्यमातून फॉर्म भरता येणार आहे. सोबत शासनाद्वारे योजनेचे जे शिबिर आयोजित केले जातात तेथे देखील या योजनेचा फॉर्म भरता येणार आहे.

Click to rate this post!
[Total: 4 Average: 3]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top