Mahajyoti Free Tablet Yojana 2024 (मुदतवाढ) फक्त काही दिवस शिल्लक, लगेच ऑनलाईन फॉर्म भरा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 1 Average: 1]

Mahajyoti Free Tablet Yojana: महाराष्ट्र सरकारने 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव अशी योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत मुलांना फ्री मध्ये टॅबलेट दिले जाणार आहेत.

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना टॅब मिळणार आहेत, त्यासोबत इतर पण काही गोष्टी भेटणार आहेत. त्या म्हणजे फ्री मध्ये तर टॅबलेट आहेच, सोबत नेट च बॅलन्स (6 GB) पण फ्री मध्ये मिळणार आहे. 

अजून पण बरेच लाभ मिळणार आहेत, त्याची सविस्तर माहिती खाली आर्टिकल मध्ये मी दिली आहे. या सोबत Mahajyoti Free Tablet Yojana साठी कोणते विद्यार्थी पात्र असणार? ऑनलाईन अर्ज कसा करायचा? अटी आणि शर्ती काय आहेत? हे पण या लेखात सांगण्यात आल आहे.

Mahajyoti Free Tablet Yojana 2024

महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती या संस्थेद्वारे फ्री टॅबलेट योजना राबवली जात आहे, याचा मोठा फायदा हा गरीब मुलांना शिक्षण घेण्यासाठी होणार आहे.

चांगली अशी योजना आहे, अर्ज केला तर खरोखरच  दहावी पास विद्यार्थ्यांना टॅबलेट भेटत आहेत. मागच्या वर्षीच आमच्या गावात एका गरीब मुलाला या महाज्योती फ्री टॅबलेट योजने द्वारे टॅब मिळाला होता, त्यामुळे योजना 100% Real आहे.

जर तुम्ही पाल्य असाल आणि तुम्हाला पण 10 वी पास मुलगा किंवा मुलगी असेल तर थोडासा वेळ काढून Mahajyoti Free Tablet Yojana ची ही माहिती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वाचून घ्या.

एकदा का योजेनची पूर्ण माहिती झाली की तुम्ही स्वतः पण या योजनेसाठी तुमच्या मोबाईल वरून पण फॉर्म भरू शकता. दरवर्षी Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra साठी अर्ज निघतात त्यामुळे टेन्शन घेऊ नका. अजून पण वेळ आहे, त्यामुळे पटकन चटदिशी फॉर्म भरून टाका.

Help Tabel

योजनेचे नावमहाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र
अंमलबजावणीमहाराष्ट्र राज्य
उद्देशगरीब मुलांना शिक्षणासाठी ऑनलाईन माध्यम उपलब्ध करून देणे.
लाभफ्री टॅबलेट, दररोज 6 GB इंटरनेट, ऑनलाईन कोचिंग क्लास, पुस्तके
लाभार्थीमागासवर्गीय, भटक्या/ विमुक्त जाती/ जमाती, विशेष मागास प्रवर्ग
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Link Table

अधिकृत संकेतस्थळ@mahajyoti.org.in
ऑनलाईन अर्जDirect Registration Link

Date Table

ऑनलाईन अर्जाची Last Date25 जुलै 2024

Mahajyoti Free Tablet Yojana Qualification Details

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी पात्रता निकष:

  • विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • विद्यार्थ्याची Cast ही OBC, VJNT किंवा SBC असावी.
  • उमेदवाराने 11 वी सायन्स साठी Admission घेतले असावे.

वर जे निकष दिले आहेत, तेवढ्याच पात्रता अटी आहेत. जे विद्यार्थी या निकषात येत असतील त्यांना महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी फॉर्म भरता येणार आहे.

Mahajyoti Free Tablet Yojana Benefits

महा ज्योती फ्री टॅबलेट योजने मार्फत पात्र विद्यार्थ्यांना खालील लाभ मिळणार आहेत:

  • महज्योती कडून फ्री टॅबलेट.
  • फ्री इंटरनेट डेटा (दररोज 6 GB)
  • ऑनलाईन कोचिंग क्लास (Access)
  • आवश्यक पुस्तके (बुक लायब्रेरी)

Mahajyoti Free Tablet Yojana Document List

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

  • विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  • 10 वी ची मार्कशीट
  • 11 वी Science Addmission पावती (बिनफाईड)
  • MHT-CET/ JEE/ NEET या परीक्षेची तयारी करत असल्याचे हमीपत्र
  • रहिवासी दाखला (तहसील)
  • जातीचे प्रमाणपत्र 
  • नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • पासपोर्ट फोटो
  • मोबाईल नंबर (आधार लिंक असलेला)
  • ईमेल आयडी
  • दिव्यांग असल्यास सर्टिफिकेट
  • अनाथ असल्यास सर्टिफिकेट

Mahajyoti Tab Registration Last Date

Tab Yojana साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सुरू झाले आहेत, पात्र अशा 10 वी पास विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे. 

फॉर्मसाठी Mahajyoti चे अधिकृत पोर्टल Develop करण्यात आले आहे, @mahajyoti.org.in या वेबसाईट वर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या आगोदर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जुलै 2024 ठरवण्यात आली होती, पण आता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 

आता Mahajyoti Tab Registration Last Date ही 25 जुलै 2024 असणार आहे. तब्बल 15 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे, त्यामुळे ज्या मुलांनी अद्याप फॉर्म भरले नाहीत त्यांच्या साठी ही दिलासादायक बाब आहे.

Mahajyoti Free Tablet Yojana Apply Online (Registration Link)

महाज्योती टॅब योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांना Mahajyoti च्या अधिकृत पोर्टल वर जाता येणार आहे.

Mahajyoti Free Tablet Yojana Registration Link
Mahajyoti Free Tablet Yojana Form 1
Mahajyoti Free Tablet Yojana Form 2

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:

  • सुरुवातीला तुम्हाला महाज्योती च्या @mahajyoti.org.in या Official Website वर जायचे आहे.
  • Mahajyoti tab registration साठी तुम्हाला पोर्टल वर होम पेज मध्ये Notice Board वर जायचे आहे, तेथे Application For MHT-CET/NEET/JEE 2025-26 Training या Option वर क्लिक करायचे आहे.
  • तुमच्या समोर Mahajyoti Free Tablet Yojana साठी Online Form Open होईल, फॉर्म मध्ये तुम्हाला जी माहिती विचारली आहे ती माहिती अगदी अचूक कोणतीही चूक न करता भरायची आहे.
  • अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती सोबत इतर माहिती पण टाकायची आहे. सर्व माहिती भरून झाली की नंतर आवश्यक असे सर्व Documents अपलोड करायचे आहेत.
  • एकदा का पूर्ण फॉर्म भरून झाला की नंतर तपासून खात्री करून घ्यायची आहे. एखादी चूक असेल तर ती दुरुस्त करायची आहे, आणि शेवटी फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे.

सूचना: पोस्टाने, प्रत्यक्ष किंवा मेल द्वारे पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. केवळ ऑनलाईन स्वरूपात सादर केलेले फॉर्म विचारात घेतले जाणार आहेत.

Mahajyoti Free Tablet Yojana Selection

महाज्योती टॅब योजनेसाठी निवड प्रक्रिया:

फ्री टॅबलेट योजने साठी काही विशिष्ट अशा प्रवर्गातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्याची माहिती ही खालीलप्रमाणे आहे.

फ्री टॅब योजने साठी प्रवर्ग निहाय जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये सामाजिक प्रवर्ग (कास्ट), दिव्यांग, अनाथ आणि महिला असे विभाग आहेत. 

टीप: 10 वी चे गुण देखील निवड प्रक्रियेत विचारात घेतले जाणार आहेत.

OBC59%
VJNT35%
SBC06%

प्रत्येक प्रवर्गात महिला, दिव्यांग आणि अनाथांना खालीलप्रमाणे जागा आरक्षित असणार आहेत.

महिला30%
दिव्यांग04%
अनाथ01%

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक गुण

10 वीग्रामीण भाग60 टक्के मार्क
10 वीशहरी भाग70 टक्के मार्क

वरील सर्व निकषात जर विद्यार्थी बसत असतील, तर त्यांना महाज्योती द्वारे Maharashtra Free Tablet Yojana चा लाभ दिला जातो.

Mahajyoti Free Tablet Yojana FAQ

फ्री टॅबलेट योजना 2024 साठी कोण पात्र आहे?

महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थी (OBC, VJNT, SBC) हे या फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2024 साठी पात्र असणार आहेत.

Mahajyoti Free Tablet Yojana साठी Registration कसे करावे?

Mahajyoti Scheme साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी www.mahajyoti.org in 2026 या पोर्टलला भेट द्यायची आहे.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी ऑनलाईन अर्जाची Last Date कोणती?

महाज्योती फ्री टॅबलेट योजना फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख ही 25 जुलै 2024 ही आहे. या आगोदर 10 जुलै हि लास्ट डेट होती, आता त्यात 15 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे.

फ्री टॅबलेट कोणाला मिळणार आहे?

फ्री टॅबलेट योजने अंतर्गत विद्यार्थ्यांची पात्रता ही विविध निकषांवरून ठरवली जाणार आहे. यात प्रवर्गानुसार जागा देखील आरक्षित असणार आहेत, आणि 10 वी च्या मार्क वर लिस्ट लागणार आहे.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 1]

6 thoughts on “Mahajyoti Free Tablet Yojana 2024 (मुदतवाढ) फक्त काही दिवस शिल्लक, लगेच ऑनलाईन फॉर्म भरा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top