Mattha Recipe Marathi: नमस्कार मित्रांनो आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे सतत काहीतरी थंड प्यावसं वाटतं, ज्यूस कोल्ड्रिंक्स हे तर चालतच राहतं परंतु शरीराला एक प्रकारे पौष्टिक आणि आरोग्यदायी असणार ड्रिंक म्हणजे आपलं मराठमोळा मठ्ठा घरी कसा बनवायचा Mattha Recipe Marathi याचीच रेसिपी आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे.
आता सध्या लग्नसराई चालू आहे, कोणत्या ना कोणत्या लग्नामध्ये तुम्ही मठ्ठा पिला असेलच. तसाच चवदार चविष्ट मठ्ठा तुम्ही घरबसल्या देखील बनवू शकता.
अगदी दोन मिनिटात घरबसल्या मठ्ठा कसा बनवायचा? याची सविस्तर रेसिपी ब्लॉगमध्ये दिलेली आहे. Mattha Recipe Marathi हा ब्लॉग वाचा आणि मस्त शरीराला पौष्टिक असणारे आपलं मराठी ड्रिंक मठ्ठा घरबसल्या बनवा.
Mattha Recipe Marathi
मठ्ठा हा मुख्यता दह्यापासून बनवला जातो, यासोबत मठ्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, असे बरेच काही टाकले जातात, ज्यामुळे मठ्ठ्याची चव एकदम भारी बनते.

मठ्ठा बनवण्याची सोपी आणि स्वादिष्ट अशी रेसिपी खालील प्रमाणे आहे:
मठ्ठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- 1 कप दही
- 2 कप थंड पाणी
- 2-3 बर्फाचे क्यूब
- अर्धा चमचा जिरे पूड
- अर्धा चमचा मीठ (चवीनुसार)
- 1/4 चमचा काळे मीठ
- अर्धा चमचा साखर (आवडत असल्यास)
- 4 ते 5 पुदिन्याची पाने (चिरून टाकावे)
- अर्धा चमचा किसलेले आले (ऐच्छिक)
- 1-2 हिरव्या मिरच्या चिरून टाकाव्या
- थोडीशी कोथिंबीर
Mattha Recipe Marathi Process
- एका भांड्यात दही घेऊन ते चांगले मिक्स करा.
- त्यामध्ये थंड पाणी टाकून ते मिश्रण छान एकसंध करा.
- आता त्यामध्ये जिरे पूड, मीठ, काळे मीठ आणि साखर टाका.
- मठ्ठा चविष्ट करण्यासाठी पुदिन्याचे पाने, आले आणि हिरव्या मिरच्या, कोथिंबीर टाका.
- त्यानंतर मिश्रण चांगले हलवून घ्या, आणि काही वेळ फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
- त्यानंतर मठ्यावर पुन्हा आवडी नुसार छोटी छोटी चिरलेली कोथिंबीर टाका.
- आणि मग गार मठ्ठा मस्तपैकी सर्व्ह करा आणि आनंद घ्या.
टिप्स:
- मसाला मठ्ठा बनवण्यासाठी त्यामध्ये थोडेसे भाजलेले जिरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू शकता.
- यासोबत तुम्हाला जर गोडसर चव आवडत असेल तर थोडी साखर देखील वाढवू शकता.
मठ्ठा पिण्याचे फायदे काय आहेत?
Mattha pinyache fayde खूप सारे आहेत, मठ्ठा हा आरोग्यदायी असतो, शरीरासाठी हा खूप फायदेशीर असतो.

- पचनासाठी मदत करतो.
- शरीराला थंडावा देतो.
- उन्हाळ्यात हायड्रेशन ठेवण्यासाठी मदत करतो.
यासारखे बरेच फायदे मठ्ठा पिण्याचे आहेत, त्यामुळे तुम्ही Mattha Recipe Marathi एकदा ट्राय करू नक्की बघा. आणि मठ्ठा बनवल्यानंतर तो कसा बनला आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद!